अहमदनगर : संगमनेरमध्ये एटीएम फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम

संगमनेरमध्ये एटीएम फोडले

संगमनेर : शहरातील तीनबत्ती चौकालगतचे अॅक्सिस बँकेचे एटीएम आज पहाटे दोन चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील ३० लाख ५८ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबविली. गॅस कटरच्या आगीमुळे काही नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत घटनास्थळी विखुरल्या होत्या. हे आज सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली.

पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी ठसेतज्ज्ञांसह श्‍वानपथकालाही पाचारण केले होते. याबाबत संतोष मीनानाथ झाडे (रा. ३७, रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत.

एटीएम रामभरोसे

गेल्या काही वर्षांत संगमनेरात झालेल्या एटीएम फोडीच्या एकाही घटनेचा तपास लागलेला नाही. कोणत्याही एटीएम चालविणाऱ्या कंपनीने अथवा बँकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली नसल्याने, सर्व एटीएम रामभरोसे आहेत.

Web Title: Ahmednagar Atm Vandalized Sangamner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top