जनआरोग्य योजना गरजूंसाठी देवदूत; वर्षभरात ३४ हजार रुग्णांना दिलासा, उपचारासाठी १७५ कोटी १२ लाख ४१ हजारांचा निधी खर्च

आयुष्मान व महात्मा फुले आरोग्य योजनांमुळे जनसामान्यांना दिलासा मिळत आहे. गत वर्षभरात जिल्ह्यातील ३४ हजार ४३५ रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
जनआरोग्य योजना गरजूंसाठी देवदूत; 
वर्षभरात ३४ हजार रुग्णांना दिलासा, उपचारासाठी १७५ कोटी १२ लाख ४१ हजारांचा निधी खर्च
Updated on

Mahatma Phule Arogya Yojana : आयुष्मान व महात्मा फुले आरोग्य योजनांमुळे जनसामान्यांना दिलासा मिळत आहे. गत वर्षभरात जिल्ह्यातील ३४ हजार ४३५ रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या उपचारासाठी १७५ कोटी १२ लाख ४१ हजारांचा निधी खर्च करण्यात आला. गरजू रुग्णांसाठी शासनाच्या दोन्ही योजना देवदूत ठरत आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होतो. १२०० हून अधिक आजारांवर योजनेतून उपचार दिले जातात. ह्दयरोग शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, प्लास्टीक सर्जरी, मूत्रपिंड शस्त्रक्रिया अशा महागड्या शस्त्रक्रिया योजनेतून केल्या जातात. डायलिसिससारख्या नियमित उपचारांचे पॅकेजही योजनेत उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील ३४ हजार ४३५ रुग्णांनी वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून उपचार घेतले आहेत. या दोन्ही योजना एकत्रित १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ४२ रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. आयुष्मान भारत योजनेचे ३१ लाख ६५ हजार लाभार्थी आहेत. १५ लाख ४० हजार व्यक्तींकडे यजनेचे कार्ड आहे.

४२ रुग्णालये अंगीकृत

महात्मा जोतिराव फुले व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या सध्या ४२ आहे. जिल्ह्यातील खासगी ४१ व सिव्हील हॉस्पिटल अशी ४२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहे.

जनआरोग्य योजना गरजूंसाठी देवदूत; 
वर्षभरात ३४ हजार रुग्णांना दिलासा, उपचारासाठी १७५ कोटी १२ लाख ४१ हजारांचा निधी खर्च
Narayana Murthy: 4 महिन्यांचा नातू बनला 240 कोटींचा मालक; नारायण मूर्तींनी गिफ्ट केले इन्फोसिसचे शेअर्स

पाच लाखांपर्यंतचे कवच

आयुष्मान जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये, तर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण मिळत होते. या दोन्ही योजनांच्या एकत्रिकरणामुळे सर्वांनाच प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांचा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येतो.

तक्रारीसाठी मदत क्रमांक

दोन्ही योजनांमधून पाच लाखापर्यंतचे आरोग्य कवच देण्यात येते. शिवाय रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते. योजनेअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यात योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पैसे मागितल्यास तक्रार दाखल करण्यासाठी मदत क्रमांक आहे. तक्रार नोंदवायची असल्यास व योजनेबाबत माहिती विचारायची असल्यास १५५३८८ व १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनआरोग्य योजना गरजूंसाठी देवदूत; 
वर्षभरात ३४ हजार रुग्णांना दिलासा, उपचारासाठी १७५ कोटी १२ लाख ४१ हजारांचा निधी खर्च
Murder Mubarak Review: दमदार कथा पण कलाकारांच्या अभिनयामुळे गंडला 'मर्डर मुबारक'; वाचा रिव्ह्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com