Murder Mubarak Review: दमदार कथा पण कलाकारांच्या अभिनयामुळे गंडला 'मर्डर मुबारक'; वाचा रिव्ह्यू

Murder Mubarak Review: चित्रपटाची कथा दमदार आहे, पण कलाकरांच्या अभिनयामुळे हा चित्रपट अर्धवट पाहून बंद करावासा वाटतो. या चित्रपटातील नेमक्या कोणत्या गोष्टी खटकल्या आणि कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या हे, या रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घेऊयात...
Murder Mubarak Review
Murder Mubarak Reviewesakal

Murder Mubarak Review: श्रीमंत व्यक्तींची ये-जा, भलं मोठं गार्डन, आजूबाजूला हिरवळ, स्विमिंगपूल, स्पा अन् बरंच काही असणाऱ्या एका आलिशान क्लबमध्ये एकेदिवशी लियो नावाच्या मुलाचा मृतदेह अढळतो. त्यानंतर पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी क्लबमध्ये येतात. त्या भव्य-दिव्य क्लबचे मेंबर्स काही श्रीमंत व्यक्ती असतात. या क्लबच्या मेंबर्सवर पोलिसांना संशय येतो. मग पुढे काय घडतं? लियोचा मर्डर कोण करतं? क्लबच्या श्रीमंत मेंबर्सच्या चेहऱ्यामागे कोणते रहस्य दडलेले असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मर्डर मुबारक या चित्रपटातून मिळणार आहेत. चित्रपटाची कथा दमदार आहे, पण कलाकरांच्या अभिनयामुळे हा चित्रपट अर्धवट पाहून बंद करावासा वाटतो. या चित्रपटातील नेमक्या कोणत्या गोष्टी खटकल्या आणि कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या हे, या रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घेऊयात...

चित्रपटाची कथा

आलिशान क्लबमध्ये लियो नावाच्या तरुणाचा मृतदेह अढळतो. त्याच्या मृत्यूचा तपास एसीपी भवानी सिंग हे करत असतात. भवानी सिंग या प्रकरणाचा तपास करताना त्यांना क्लबमधील मेंबर्सवर संशय येत असतो. संशयाची सुई बँबी, काशी, शहनाज नूरानी, कुकी,रोशनी बत्रा,रणविजय सिंग,यश यांच्यावर जाते. आता एसीपी भवानी सिंग हे लियोचा खुन करणाऱ्याला शोधू शकतात का? लियोच्या मृत्यूचा तपास करताना एसीपी भवानी सिंग यांना क्लबमधील कोणती रहस्ये कळतात? हे सर्व मर्डर मुबारक या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाची कथा दमदार आहे. कथेत वेगवेगळे ट्विस्ट आहेत, जे थक्क करताना पण हे ट्विस्ट कलाकारांना त्यांच्या अभिनयातून मांडता आले नाहीत.

कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपट गंडला

मर्डर मुबारक या चित्रपटातील केवळ पंकज त्रिपाठी यांचा अभिनय चांगला आहे, असं तुम्हाला ट्रेलर बघून वाटेल पण पंकज त्रिपाठी यांचा क्रिमिनल जस्टिसमधील अभिनय आणि या चित्रपटातील अभिनय हा सारखाच वाटतो. पंकज त्रिपाठी हे वर्सटाईल अॅक्टर म्हणून ओळखले जातात म्हणूनच प्रेक्षकांना पंकजजींकडून जास्त अपेक्षा आहेत, त्यामुळे असं वाटते की, एसीपी भवानी सिंग हे पात्र ते आणखी चांगल्या पद्धतीनं रंगवू शकले असते.

चित्रपटातील बाकी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सिरियस सीनला पण हसू येईल, असा सारा अली खानचा अभिनय या चित्रपटात आहे. खरंतर चित्रपटाची कथा ही साराच्या भूमिकेभोवती फिरते, पण सारानं या चित्रपटातील इमोशनल आणि इंटेन्स सीनची अॅवरेज अभिनय करुन चव घालवली, असं म्हणता येईल. चित्रपटात करिश्मा कपूर देखील आहे, पण तिचा स्क्रिन टाईम कमी असल्यामुळे तिचा करिश्मा स्क्रिनवर दिसत नाही.

Murder Mubarak Review
Shaitan Review: आर.माधवन भाव खाऊन गेला, हिरोपेक्षा व्हिलन वरचढ ठरला, पण काही गोष्टी मात्र खटकल्या, कसा आहे शैतान? वाचा रिव्ह्यू

दिग्दर्शन

मर्डर मुबारक या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं आहे.एवढ्या मोठ्या स्टार कास्टला घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.

मर्डर मुबारक या चित्रपटाला मी पाच पैकी तीन स्टार देते. एक स्टार- या चित्रपटात वापरण्यात आलेल्या सेटला, दुसरा स्टार- या चित्रपटाच्या कथेला, तिसरा स्टार- या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com