esakal | Ahmednagar : रस्ता व पाण्यावरून श्रेयवादाची लढाई
sakal

बोलून बातमी शोधा

nagar

Ahmednagar : रस्ता व पाण्यावरून श्रेयवादाची लढाई

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी: प्रवरातीरी आजी माजी मंत्र्यात आणि गोदातीरी आजी माजी आमदारांत श्रेयवादाच्या लढाई सुरू तोंड फुटले. कुणी स्वाक्षरी ठोकलेले फ्लेक्स गावोगाव लावून पाणदेव होतोय, तर कुणी एका झटक्यात दिडशे कोटी आणल्याचा दावा करतोय. त्याला प्रतिवाद करण्यासाठी कुणी सोशल मिडीयातून चित्रफिती व्हायरल करून निधीचे श्रेय आपले असल्याचे सांगतोय, तर कुणी कालवे खोदायलाच निधी नाही मग पाणदेव कसे होता? पाणी मराठवाड्यात जाते त्यावेळी मंत्री असून गप्प का बसता? असे अडचणीचे सवाल विचारतोय. मात्र, पन्नास वर्षापासून निळवंडे धरण आणि वीस वर्षांपासून नगर, कोपरगाव रस्ता का रखडला? यावर यातील प्रत्येकजण सोयीस्कर मौन बाळगतोय.

दोघांचेही समर्थक एकाचवेळी आपल्या नेत्याची वाहवा करू लागले. प्रत्यक्षात हा रस्त्या अद्यापही खड्ड्यातच आहे. या रस्त्याचा विस वर्षांपासून खेळखंडोबा का झाला याचे उत्तर कुणाकडेही नाही. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी आपणच या कामाचा पाठपूरावा केला. सिन्नर ते सावळिविहीर पर्यतच्या रस्त्याच्या कडेला पालखी मार्ग आहे. मग कोपरगाव ते नगर रस्त्यासाठी तो का नाही. पदयात्री भाविकांना शिर्डीला यायचे कसे ? हे यांना कळले कसे नाही ? चाळीस कोटी रस्ता दुरूस्तीसाठी आले त्याचे काय झाले ? असे नेमके सवाल त्यांनी उपस्थित केलेत.

विखे पाटलांच्या टिकेला थोरात सहसा उत्तर देत नाहीत. सत्ता गेल्याच्या वैफल्यातून विखे पाटील असे बोलत असावेत असा अंदाज मात्र आवर्जून व्यक्त करतात. तथापि हे निळवंडे धरण पन्नास वर्षे का रखडले. याचे उत्तर कुणीही देत नाही. या श्रेयवादाला मंत्री नितीन गडकरी यांनी खमंग फोडणी दिली. ते म्हणाले, निळवंडेसाठीची अर्थिक तरतुद खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पाठपूराव्यामुळे झाली. आता लोखंडे यांनी गावोगाव असे फ्लेक्स लावले तर आश्चर्य वाटायला नको.

हेही वाचा: Ahmednagar : नेवासेत पुन्हा ‘ऑडिओ बॉम्ब’

गोदातीरी सावळिविहीर ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात श्रेयवादाचा संघर्ष सुरू झाला. कार्यक्रमात त्यांनी कोल्हे या निधीसाठी पाठपूरावा करीत असल्याचा संदर्भ दिला. या रस्त्यासाठी दिडशे कोटी मंजुर केल्याचे जाहिर केले. त्यापाठोपाठ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले. त्यावर या रस्त्यासाठी कोल्हे यांनी पाठपूरावा केल्याचा दावा करण्यात आला. मग काळे यांनी आपण माजी केंद्रीय मंत्री पवार व गडकरी यांची भेट घेऊन त्यांना कशी निवेदने दिली. आपल्या पाठपूराव्यामुळे हा निधी कसा मिळाला, याची सचित्र माहिती देणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमातून व्हायरल केल्या.

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूत पुढील वर्षी पाणी शेतात अशा आशयाचे फ्लेक्स स्वाक्षरीसह लावले. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी कालव्यांच्या कामासाठी निधी नाही मग काम पूर्ण करून पाणी कसे देणार आणि समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये वरच्या बाजुच्या धरणातील पाणी जायकवाडीत जाते त्यावेळी मंत्री असून आपण गप्प का बसता. असे दोन अडचणीचे थोरातांना विचारायला सुरवात केली.

loading image
go to top