Ahmednagar: बायोडिझेल प्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह आठ जणांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

अहमदनगर : बायोडिझेल प्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह आठ जणांना जामीन

अहमदनगर : जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्‍त पथकाने अहमदनगर शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर बायोडिझेलची अवैध विक्री करणाऱ्यांवर छापे टाकले होते. या गुन्ह्यातील आरोपी व शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुतेंसह आठ जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्यासमोर आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरातून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावरील हॉटेलवर ता. 22 ऑक्‍टोंबर रोजी छापा टाकला होता. या ठिकाणी बायोडिझेलसह तिघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, मयूर बडे, महेंद्र कोळेकर, कुणाल नरसिंधानी, रोशन माखिजा, विशाल रमेश भांबरे, राजू साबळे, गौतम बेळगे, अशोक कोतकर, विक्रांत वसंत शिंदे आदींचा समावेश आढळून आला.

हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

आरोपी कुणाल नरसिंधानी आणि रोशन माखिजा यांच्या वतीने म्हणणे सादर करण्यात आले की, कंपनीकडून शासनाचे सर्व कर भरून बायोडिझेल खरेदी केले जाते. हे बायोडिझेल विकतानाही सर्व सबरदारी घेतली जाते. बायोडिझेल घेणारे त्याचा वापर कोणत्या कारणासाठी करतात, याची आमचा संबंध नाही, असा बचाव ऍड. महेश तवले, ऍड. संजय दुशिंग, ऍड. विक्रम शिंदे यांनी केला.

दिलीप सातपुते यांच्या वतीने ऍड. सतीश गुगळे यांनी युक्‍तीवाद केला. या गुन्ह्यात लावण्यात आलेले जीवनावश्‍यक वस्तू कायदा या ठिकाणी लागू होत नाही. स्फोटके कायदाची लागू होत नाही. पोलिसांनी या गुन्ह्यात जे कायदे लागत नाही, ते कायदे लावलेले आहे, असे म्हणणे सादर केले.

हेही वाचा: नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

विक्रांत शिंदे यांच्या वतीने ऍड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी बाजु मांडली. आरोपीकडून कोणताही माल जप्त करावयाचा नाही. या गुन्ह्यातील आरोपींनी नाव घेतले म्हणून आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी लावलेली कलमे या ठिकाणी लागू होत नाही, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरले. 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. पोलिस ठाण्यात हजेरी देणे, तपासी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आदी अटी लादल्या आहेत.

Web Title: Ahmednagar Biodiesel Crime Court Criminal Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarcrimeCourt