

Ahmednagar Bread and Pav Sales Under Scrutiny Over Missing Expiry Dates and Concerns About Food Safety and FDA Monitoring
sakal
-अरुण नवथर
अहिल्यानगर: घराघरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पॅकिंग ब्रेड, पाव, बिस्किट यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात काही लहान-मोठ्या दुकानांमधून एक्सपायरी डेट नसलेल्या अथवा मुदत संपलेल्या ब्रेडची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहक देखील एक्सपायरी डेट न तपासताच हे पदार्थ खरेदी करत आहेत. एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभाग मोठ-मोठ्या हॉटेल्सवर कारवाई करत आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत आहे.