

Ahmednagar ACB Trap Inspector Accused of Taking 75000 Rupees Bribe for Releasing Pending 24 Lakh Rupees Development Bill
sakal
अहिल्यानगर: महानगरपालिका क्षेत्रातील कामाचे २४ लाख रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी ७५ हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून समाज कल्याण विभागाचे निरीक्षक संदीप हरिभाऊ फुंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.