Ahmednagar : वाढता ‘स्क्रीन टाइम’ मुलांच्या जिवावरवाढता ‘स्क्रीन टाइम’ मुलांच्या जिवावर

मोबाईलच्या व्यसनापायी काहींना जीवही गमवावा लागला आहे
Screen Time of mobile phones
Screen Time of mobile phonesesakal

मिरजगाव : मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक समस्या वाढत आहेत. मोबाईलच्या आभासी विश्वात वावरणारी अल्पवयीन मुलं नैराश्यातून व्यसनाधिनतेकडे वळताना दिसत आहेत. शहरी भागातील हे लोन आता ग्रामीण भागातदेखील पोचले आहे. मोबाईलच्या व्यसनापायी काहींना जीवही गमवावा लागला आहे. पालकांनी याबाबत वेळीच सजग होण्याची गरज आहे.

सध्या हातात मोबाईल आल्याने इंटरनेटवरील आभासी जगात मुले रमू लागली. अनेक अल्पवयीन मुले डिजिटल व्यसनाधिनतेकडे वळू लागली. मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम सध्या दिसू लागले आहेत. सोशल मीडियाच्या आभासी विश्वात रमलेल्या अशाच काही मुलांनी नकळत टोकाचे पाऊल उचलले आहे. मोबाईल दिला नाही म्हणून, तर कधी रील्स बनविण्याच्या नादात मुले आपला जीव गमावून बसण्याच्या तीन घटना गेल्या वर्षभरात मिरजगाव परिसरात घडल्या आहेत. या घटना पालकांची चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत.

Screen Time of mobile phones
Sambhaji nagar : पाणीपट्टी वसुलीच्या नावाने बोंबाबोंब

मुलांचा वाढत असलेला स्क्रीन टाइम त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे. बहुतांश मुलांकडे स्वतःचे मोबाईल किंवा संगणक आहेत. स्क्रीन टाइम वाढल्याने त्यांची वागणूक आक्रमक, हिंसक झालेली दिसत आहे. त्यांचा शिक्षणातला रस कमी होताना दिसत आहे. पालक घरी नसताना किंवा कामात असताना ही मुलं काय पाहतात, याकडे आपले लक्ष आहे का, याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

Screen Time of mobile phones
Aisha Ahmed : आयशाचा स्टाईलिश अंदाज,चाहते पार फिदा...

नैराश्यातून टोकाचे पाऊल

सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहिल्यावर त्यांच्याशी तुलना करणं, त्यातील ऐषारामाच्या जीवनशैलीशी आपल्या गरिबीची तुलना करणे, या गोष्टीमुळे एक प्रकारचे नैराश्य येते. त्यात वाढ होऊन अशा घटना घडतात. त्यामुळे पालकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून या डिजिटल व्यसनापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे.

पालकांनो, याकडे लक्ष द्या...

मुलांच्या मोबाईलवापराकडे लक्ष द्या

खेळणी आणून देऊ नका, तर त्यांच्याशी खेळा

मुलांशी सुसंवाद साधा

सांघिक मैदानी खेळांची मुलांना गोडी लावा

मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवले पाहिजे. त्यांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाइम हळूहळू कमी करावा. ज्या वेळी मुले मोबाईल मागतात, त्या काळात ग्राउंडवरच्या खेळात त्यांना व्यग्र करा. त्यामुळे त्यांचा एकाकीपणा कमी होईल. मुले मोबाईलच्या खूपच आहारी गेले असल्यास गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

- डॉ. अशोक कराळे, मानसोपचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com