
महापालिकेचे ८०२ कोटींचे बजेट!; अहमदनगर शहराच्या विकासासाठीचे अंदाजपत्रक
अहमदनगर : महानगर पालिकेचे पुढील वर्षासाठी (२०२२-२३) ८०२ कोटींचे अंदाजपत्रक आज आयुक्त शंकर गोरे यांनी स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांच्याकडे सादर केले. त्यामध्ये शहराच्या विकासासाठी विविध निधीची तरतूद करण्यात आली आहे. सादर केलेल्या या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ३७२ कोटी ९१ लाख, भांडवली जमा ३७२ कोटी चार लाख नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेत आज हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, सहायक आयुक्त सचिन राऊत, मुख्य लेखाधिकारी शहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.
नवीन अंदाजपत्राकत शहरातील रस्ते दुरुस्ती, आरोग्य, वीज, पाणी सेवा दर्जेदार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. कामांसाठीच्या निधीतील कामे पूर्णत्त्वास नेणे, नवीन कामांसाठी शासनाकडून निधी मिळविणे, घनकचरा संदर्भातील कामे, शहर स्वच्छता अभियान, गतिशील प्रशासन तसेच शहर व उपनगरांतील विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
महसूल उत्पन्नात संकलीत करापोटी
५१ कोटी २२ लाख
संकलीत करावर आधारित करापोटी ६७ कोटी २१ लाख
जीसटी अनुदान १११ कोटी ६७ लाख
इतर महसूली अनुदान २७ कोटी ६५ लाख
गाळा भाडे ३ कोटी
पाणीपट्टी २६ कोटी ४० लाख
मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी ४२ कोटी
संकीर्ण २४ कोटी ८० लाख
भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व
मनपा हिस्सा धरून ३७२ कोटी चार लाख
असा होईल खर्च
वेतन, भत्ते व मानधन १२६कोटी ३६ लाख
पेन्शन ४२ कोटी ७७ लाख
पाणी पुरवठा वीज बिल ३३ कोटी
पथदिवे वीज बिल तीन कोटी
शिक्षण मंडळ वर्गणी चारकोटी ३० लाख
मागासवर्गीय कल्याणकारी योजना ५ कोटी २५ लाख
अपंग पुनर्वसन योजना १ कोटी ६० लाख
मागासवर्गीय कल्याणकारी योजना ५ कोटी २५ लाख
अपंग पुनर्वसन योजना १ कोटी ६० लाख
औषधे व उपकरणे १ कोटी
सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ७ कोटी ४७ लाख
टॅंकरने पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी १ कोटी ७० लाख
अशुद्ध पाणी आकार २ कोटी
विविध वाहने खरेदी २ कोटी ३० लाख
शहरातील ओढे नाले सफाई ४५ लाख
आपत्कालीन व्यवस्थापन ४० लाख
कोंडवाड्यावरील खर्च २० लाख हिवताप प्रतिबंधक योजना ४० लाख
कचरा डेपो सुधार प्रकल्प उभारणी ४१ लाख
मोकाट कुत्रीव जनावरे बंदोबस्त १ कोटी ३५ लाख
नवीन रस्ते १५ कोटी
रस्ते दुरुस्ती १२ कोटी
इमारत दुरुस्ती ५० लाख
वृक्षारोपन खर्च ८५ लाख
Web Title: Ahmednagar City Municipal Corporation Budget Of 802 Crores
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..