नगर शहर होणार पंचतारांकीत, महापालिकेची फुल्ल तयारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

याचबरोबर भाजीबाजारातील नागरिकांशी विविध प्रश्न विचारून चर्चा केली. नागरिकांनी समाधानकारक उत्तरे देऊन महापालिकेला सहकार्य करावे.

नगर : केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत' व राज्य सरकारच्या "माझी वसुंधरा' अभियानासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली असून, आपले शहर आता "फाइव्ह स्टार' मानांकनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच कोणत्याही दिवशी केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करतील.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी पूर्वतयारी म्हणून पाहणी केली. महापालिकेने या अभियानात भाग घेतला असून, नागरिकांच्या सहकार्यातून आपण "स्वच्छ भारत' अभियानात "फाइव्ह स्टार' मानांकन नक्कीच मिळवू. प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी स्वच्छतागृहांची पाहणी केली.

याचबरोबर भाजीबाजारातील नागरिकांशी विविध प्रश्न विचारून चर्चा केली. नागरिकांनी समाधानकारक उत्तरे देऊन महापालिकेला सहकार्य करावे. याचबरोबर, रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी लोकसहभागाची खरी गरज आहे.

महापालिकेचे कर्मचारी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नगरकरांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar city will be five star, full preparation of Municipal Corporation