
कत्तलीसाठी मुंडके बांधून आणलेल्या 18 गाईंची सुटका; पाहा व्हिडिओ
अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची सुटका नगर तालुका पोलिसांनी केली आहे. भातोडी (ता. नगर) शिवारात शनिवारी (ता. 19) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपी शाहरुख सादीक सय्यद (रा.माळीचिंचोरा, ता. नेवासे), रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, ता. नेवासे) या दोघांना अटक केली आहे. (Ahmednagar Crime News)
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, भातोडी शिवारात कत्तलीसाठी जनावरे एका ट्रकमधून आणण्यात आली आहेत. नगर तालुका पोलिसांच्या पथकाने दुपारी दोनच्या सुमारास भातोडी शिवारातील एका घराच्यासमोर उभा असलेल्या ट्रक (एम.एच.18 बी.जी. 5315) तपासाणी केली असता, त्यात 3 गोवंशी जातीचे जर्सी गाई त्यांचे पाय मुंडके बांधलेले मिळून आल्या, काही लहान जर्सी गाई व एक खिलार जातीची गाई व दोन वासरे खाली काटेरी झाडे झुडपात गोवंशी 15 गाई डांबून ठेवलेली होती.
हेही वाचा: म्हाडा व टीईटी प्रकरण: दोन दलालांना अटक; पुणे पोलिसांची कारवाई
या ठिकाणी आरोपी शाहरुख सादीक सय्यद (रा. माळीचिचोरा, ता. नेवासे) आणि रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, ता. नेवासे) यांना या जनावरांबाबत विचारणा केली, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यांना अटक करण्यात आली. दहा लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक, तीन लाख 34 हजार रुपये किंमतीच्या गायी असा 13 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस नाईक सचिन वनवे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे पुढील तपास करीत आहेत.
या पथकाने केली कारवाई
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक उपनिरीक्षक दिनकर घोरपडे, पोलिस नाईक सचिन वनवे, रावसाहेब खेडकर, संभाजी बोराडे, आनंद घोडके, जयदत्त बांगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Ahmednagar Crime Cow Cutting Police Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..