Crime News : बायकोशी भांडण पडलं महागात; संतप्त सासऱ्याने जावयाला बदडले

Crime News
Crime Newsesakal

गुंजाळे (ता. राहुरी) : सासऱ्यासमोर बायकोशी केलेले भांडण जावयाच्या चांगलेच अंगलट आले. संतप्त सासर्‍याने मुलीशी भांडणाऱ्या जावयाच्या डोक्यात विळा मारून जखमी केले. राहुरी पोलीस ठाण्यात जावयाच्या फिर्यादीवरून सासर्‍याविरुद्ध मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Crime News
Ahmednagar : संभाजी महाराजांच्या मिरवणुकीवर दगडफेक! बोधेगावात कडकडीत बंद

बाळासाहेब रामचंद्र बारसे (रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) असे आरोपी सासर्‍याचे नाव आहे. नितीन चार्लस लोंढे (वय ४१, रा. गुंजाळे, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, मुलीला भेटण्यासाठी सासरे घरी आले होते. सोमवारी (ता. १५) रात्री साडेनऊ वाजता घरासमोर आई, पत्नी, मुले व सासरे उभे होते. त्यावेळी आईने जनावरांचा चारा आणावा लागेल असे सांगितले.

Crime News
Nilesh Lanke : विरोधी आमदारांच्या हक्कांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून गदा; लंकेंची टीका

पत्नी अलिशा हिला जनावरांचा चारा का आणला नाही. अशी विचारणा केली. त्यावरून आमच्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्याचा राग आल्याने सासर्‍यांनी डोक्यात विळा मारून मला जखमी केले. माझ्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा माझ्या मुलीला त्रास दिला. तर तुम्हाला जीवे मारीन. अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com