esakal | चोरीच्या मुद्देमालासह मोटार जप्त ; एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

चोरीच्या मुद्देमालासह मोटार जप्त ; एकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राशीन : राशीन-करमाळा रस्त्यावरील राहुल जांभळकर यांचे दुकान फोडून पावणेचार लाखांच्या तांब्याच्या जुन्या व नव्या वायर चोरणाऱ्या चोरांचा छडा लावला. बीडचे तीन आरोपी निष्पन्न करून त्यातील एकास अटकही झाली आहे. त्यांच्याकडून पाऊण लाखाची १४७ किलो तांब्याची वायर आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी २८ ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास राशीन -करमाळा रस्त्यावरील राहुल जांभळकर यांचे दुकान फोडून तीन लाख ऐंशी हजारांच्या तांब्याच्या जुन्या व नव्या वायर तीन चोरांनी लांबविल्या. याबाबत जांभळकर यांनी राशीन पोलिसांत फिर्याद दिली.

त्यांनतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक पथक तयार करून त्यांना तपासाच्या योग्य सूचना दिल्या. त्यानंतर सीसीटीव्ही तपासले असता, संबंधित आरोपी राशीन- करमाळा, जामखेड, पाटोदा, मांजरसुंबेमार्गे बीडकडे गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सोयब कमरोद्दीन शेख (वय २६) यास अटक केली असून, त्याचे दोन सहकारी फारुख शेख व सलमान शेख पसार आहेत.

loading image
go to top