esakal | घरफोडी करणाऱ्यास निंबळकमधून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

घरफोडी करणाऱ्यास निंबळकमधून अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतत रात्रीच्या वेळी बंद दरवाजे तोडून घरफोड्या व मोटारसायकल चोरी करणाऱ्यास अटक करण्यात आली. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा लावून निंबळक परिसरातील एमआयडीसी परिसरात आरोपी असल्याची माहिती घेतली होती, तशाच पद्धतीने पथक तयार करून त्या ठिकाणी गेले असता आरोपीला ताब्यात घेतले.

त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी आंबादास भास्‍कर भाबड (सध्या रा. निंबळक) याने दोन गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे घरफोडी करण्याचे साहित्य झडतीच्या वेळी वेळी आढळलेले इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

loading image
go to top