Ahmednagar Crime : डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; दोन जण जखमी

सरकारी वाहनाला धडक, दोन पोलिस जखमी
Ahmednagar Crime : डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर हल्ला; दोन जण जखमी

Crime News : कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या श्रीगोंद्याच्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यात पोलिसांच्या वाहनाचे नुकसान होऊन दोन पोलिसही जखमी झाले.

यातील एक आरोपी तडीपार आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहराजवळील श्रीगोंदे ते कर्जत रस्त्यावरील कुकडी वितरिका १२ लगत घडली.

Ahmednagar Crime : डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर हल्ला; दोन जण जखमी
Nagpur Crime : प्रेमविवाहाला फक्त ६ महिने झाले होते तरी सुरक्षारक्षकाने संशयावरून केला पत्नीचा खून

याप्रकरणी पोलिस वाहन चालक दादाराम म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अतिक गुलामहुसेन कुरेशी (कुरेशी गल्ली, श्रीगोंदे), नदीम महंमद कुरेशी (वय ४२ श्रीगोंदे), ओंकार दशरथ सायकर (वय २२ राहू, ता. दौंड, पुणे) व समद कादरजी कुरेशी (वय ५९, करमाळा, सोलापूर) यांच्याविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ चे उल्लंघन, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम यासह इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagar Crime : डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर हल्ला; दोन जण जखमी
Crime News : ‘पुष्पा’चा थ्रिलर; केदारवाडीत एक कोटीचे रक्तचंदन जप्त

फिर्यादीनुसार, आरोपींनी काही जनावरे कत्तल करण्यासाठी एका पत्र्याच्या शेडमध्ये घटनास्थळी डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर त्या भागात गस्त घालणारे पोलिस कर्मचारी महादेव नवसारे व वाहन चालक असणारे पोलिस दादाराम म्हस्के घटनास्थळाकडे गेले.

Ahmednagar Crime : डांबून ठेवलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर हल्ला; दोन जण जखमी
Kalva Hospital News : कळवा हॉस्पिटल रुग्ण मृत्यू प्रकरणाचा अहवाल आज नाहीच; समितीला हवाय आणखी वेळ

पोलिसांचे वाहन येताना दिसल्यावर आरोपीनी संगनमताने त्यांच्याकडील मोटार कार पोलिस वाहनावर आतील पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धडकविली. त्यात दोन पोलिस जखमी झाले.

त्यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली. तरीही यातील तिघांना पोलिसांनी पकडले. मात्र अतिक कुरेशी हा पळून गेला पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्हा स्थळसीमेचे हद्दीतून हद्दपार केलेले असताना तो येथे होता. पोलिसांनी आरोपींकडून काही जनावरे व मोटारकार हस्तगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com