Kalva Hospital News : कळवा हॉस्पिटल रुग्ण मृत्यू प्रकरणाचा अहवाल आज नाहीच; समितीला हवाय आणखी वेळ

kalva Thane Hospital
kalva Thane Hospital sakal

Kalva Hospita News : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावेळी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडल्यामुळे संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला चांगलेच घेरले होते. या प्रकरणाचा अहवाल आज सादर करण्यात येणार होता.

मात्र आता ही चौकशी करण्यासाठी विलंब होणार आहे. तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे चौकशीला विलंब होत असल्याचे समितीने कळविले आहे.

kalva Thane Hospital
Ajit Pawar Vs Sharad Pawar : आता फोटो लावू देणार का ? शरद पवारांच्या त्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने विचारले गंभीर प्रश्न !

निपक्ष आणि योग्य चौकशी करण्यासाठी समितीने राज्य सरकारला पत्र लिहून वेळ वाढवून मागितला आहे. यावेळी तांत्रिक अडचणी येत असल्याने आम्हाला व्यवस्थित चौकशी करायची आहे. यासाठी आम्हाला वेळ वाढवून मिळावा अशी विनंती यावेळी केली आहे.

kalva Thane Hospital
Ajit Pawar Latest Update : अजित पवार आमचेच नेते, शरद पवारांच्या विधानावर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, विश्वास...

यावेळी आणखी पंधरा दिवसांचा अवधी चौकशी करण्यासाठी आम्हाला द्यावा अशी विनंती राज्य सरकारला समितीने केली आहे. त्याचबरोबर विलंब का होत आहे? याचे कारणे देखील समितीने राज्य सरकारला कळवली आहेत.

kalva Thane Hospital
CM Eknath Shinde : आमचीच खरी शिवसेना, आमच्यात फूट नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समितीला योग्य आणि निष्पक्ष चौकशी करायची असल्याने त्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. जबाब नोंदणीची प्रक्रिया मोठी आहे. असे म्हणत आम्हाला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती समितीने राज्य शासनाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com