अहमदनगर : चित्रपटातून दिघे यांचे कार्य जनतेसमोर; कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Dharmaveer movie free premiere show for Shiv Sainiks

अहमदनगर : चित्रपटातून दिघे यांचे कार्य जनतेसमोर; कदम

अहमदनगर : शिवसैनिक कसा असावा, हे आनंदराव दिघे यांच्या कार्यातून दिसून येते. जनतेच्या कामांसाठी आपले आयुष्य पणाला लावून त्यांनी समाजशील नेता कसा असतो हे दाखवून दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. जनमानसात त्यांची प्रतिमा नेहमीच उंचावलेली राहिली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्य लोकांसमोर आल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती येत आहे. हा चित्रपट शिवसैनिकांसह नवकार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा चित्रपट शिवसैनिकांसाठी मोफत प्रिमिअर शो चे आशा स्क्वेअर चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, पुष्पा बोरुडे, स्मिता अष्टेकर, अनिल शिंदे, संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, गणेश कवडे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, उपनेते (कै.) अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Web Title: Ahmednagar Dharmaveer Movie Free Premiere Show For Shiv Sainiks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top