esakal | अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 559 नवे कोरोना रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

In Ahmednagar district, 559 new corona patients have been found in a day

जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत नगर शहर अग्रस्थानी आहे. शहरात रोज सरासरी दीडशेच्या आसपास रुग्ण आढळत होते.

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 559 नवे कोरोना रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात या वर्षीचा कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक वाढला आहे. दिवसभरात 559 नवे रुग्ण आढळून आले, तसेच पाच रुग्णांचा मृत्यू झाला. बाधित आढळलेल्यांमध्ये नगर शहरातील सर्वाधिक 229 रुग्णांचा समावेश आहे. 

अहमदनगरमध्ये आणखी सात ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन

जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत नगर शहर अग्रस्थानी आहे. शहरात रोज सरासरी दीडशेच्या आसपास रुग्ण आढळत होते. मात्र, आता संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात आज 229 रुग्ण आढळले. संगमनेर तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला. संगमनेरात 55 रुग्ण आढळले. कोपरगाव 50, राहाता 39, शेवगाव 31, अकोले 27, जामखेड 24, नेवासे व पारनेर प्रत्येकी 15, राहुरी व नगर तालुका प्रत्येकी 14, पाथर्डी व भिंगार प्रत्येकी 8, श्रीगोंदे 5, कर्जत 3, तर अन्य जिल्ह्यांतील 5 रुग्णांचा यात समावेश आहे.

कोरोनामुळे हॉटेल बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 80 हजार 988 झाली. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 1177 झाली. सध्या 2546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या 235 रुग्णांना दिवसभरात घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77 हजार 265 झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.40 टक्के आहे.
 

loading image
go to top