esakal | अहमदनगरमध्ये आणखी सात ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal administration has declared micro containment zones in Ahmednagar city

सध्या नगर शहरात 10 ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, आणखी काही ठिकाणे बंद होण्याची शक्‍यता आहे. 

अहमदनगरमध्ये आणखी सात ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बोल्हेगाव परिसरातील तीन ठिकाणे शनिवारी (ता. 13) महापालिका प्रशासनाने मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. त्यानंतर आज सावेडीतील तीन ठिकाणे, केडगावमधील बनकर मळा, सारसनगर, माणिकनगर, विनायकनगर हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या नगर शहरात 10 ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, आणखी काही ठिकाणे बंद होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनामुळे हॉटेल बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

सावेडी उपनगरातील बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा, सिव्हिल हडको व कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे लक्षात घेऊन, महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

कोणीही विचलित होऊ नका; मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी

त्यात बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथील आर्यन अपार्टमेंटमधील विंग-बी व सी इमारती, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील जयश्री कॉलनीतील ज्ञानेश्‍वरी बंगल्यापर्यंत, सिव्हिल हडको परिसरातील गणेश चौक येथील काही परिसर, नगर-पुणे रस्त्यावरील माणिकनगर भाग, नीलायम हाउसिंग सोसायटी परिसर, सारसनगरमधील चिपाडे मळा येथील पावन गणपती मंदिर परिसर, केडगाव देवी रस्त्यावरील बनकर मळा परिसर 28 मार्चपर्यंत मायक्रो कंटेन्मेंट झोन राहणार आहे. महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी या परिसराची सोमवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर हा भाग 'सील' करण्यात आला. या भागात महापालिकेकडून जीवनावश्‍यक वस्तू सशुल्क पुरविण्यात येणार आहेत. 

मायक्रो कंटेन्मेंटचा फायदा
 
महापालिकेने पूर्वीप्रमाणे मोठा परिसर कंटेन्मेंट झोन न करता, या वेळी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. सर्वच नागरिकांना वेठीस न धरता, केवळ जास्त रुग्ण आढळून आलेला भागच याअंतर्गत "सील' करण्यात येत आहे. त्यामुळे 14 दिवस परिसरातील अन्य नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत नाही.

loading image
go to top