
अहिल्यानगर: गोवा येथून कौटुंबिक सहलीहून परतणाऱ्या नगर शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी इंडिगो विमानाच्या प्रवासात एका महिलेचे प्राण वाचवले. ३५ हजार फूट उंचीवर घडलेल्या या आपत्कालीन प्रसंगात त्यांनी दाखवलेली तत्परता, वैद्यकीय कुशलता आणि मानवतेची जाणीव कौतुकास पात्र ठरली आहे.