

अहमदनगर : कल्याण रस्त्यावरील ड्रीम सिटी गृहप्रकल्पाला महापालिकेने अनधिकृतरीत्या नळजोड दिला असून, हा नळजोड आम्ही पुन्हा तोडणार असल्याचा इशारा केडगावमधील नगरसेवकांनी दिला आहे. या नळजोडामुळेच केडगावात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.
केडगावातील शिवसेनेचे नगरसेवक विजय पटारे, अमोल येवले व संग्राम कोतकर यांनी केडगावमधील पाणीप्रश्नाबाबत महापौर रोहिणी शेंडगे यांची भेट घेतली. महापौर शेंडगे यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्यासह नगरसेवकांची बैठक घेतली. केडगावला सहा दिवसांतून एकदाच पाणी येत आहे. ड्रीम सिटीतील रहिवाशांना मात्र २४ तास पाणी सुरू आहे. केडगावच्या पाइपलाइनमधून त्यांना अनधिकृतरीत्या पाणी दिले जात आहे. हा केडगावमध्ये राहणाऱ्या एक लाख नागरिकांवर अन्याय आहे. मनपाने हे पाणी बंद केले नाही, तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशारा यावेळी येवले व पटारे यांनी दिला.
महापालिकेत झालेला ठराव व तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेनंतरच ड्रीम सिटीला पाणी दिल्याचे यावेळी निकम यांनी सांगितले, तर या संदर्भात योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन महापौर शेंडगे यांनी दिले. केडगावच्या नगरसेवकांनी ड्रीम सिटीचे नळजोड यापूर्वी तोडले होते. त्यावर महापालिकेत मोठे वादंग उभे राहिले होते. तोडलेला नळजोड महापालिकेने पुन्हा जोडला होता. आता या नगरसेवकांनी पुन्हा नळजोड तोडण्याचा इशारा दिल्याने केडगावचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनधिकृत नळजोड रडारवर
‘ड्रीम सिटी’च्या निमित्ताने शहर व उपनगरांतील अनधिकृत नळजोडांचा प्रश्न पुन्हा रडारवर आला आहे. शहरात एक लाखापेक्षा अधिक मालमत्ता आहेत. नळजोड मात्र त्या प्रमाणात नाहीत. सुधारित पाणीयोजनेअंतर्गत नळजोड देण्यात येत असले, तरी अनधिकृत नळजोडांची संख्या अधिक आहे. हे अनधिकृत नळ आता महापालिकेच्या रडारवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.