

Ahmednagar Water Scarcity 470 Crore Relief Plan Proposed for 1110 Villages and 5234 Hamlets Until June 2027 Across District
sakal
अहिल्यानगर : यंदा दुष्काळाचे चटके सर्वांनाच सहन करावे लागणार आहे. आतापासूनच प्रशासनाने दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. पुढील दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे, तसेच २०८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यासाठी ४७० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा प्रस्तावित केला असल्याची माहिती आज येथे दिली. जून २०२७ पर्यंत जिल्ह्यातील १ हजार ११० गावे व ५ हजार २३४ वाड्यांकरिता हा आराखडा प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.