Ahmednagar Drought : पावसाअभावी तलाव कोरडे; जामखेडवर दुष्काळाचे सावट खैरी, मोहरीतील पाणी राखीव

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि मोहरी लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
ahmednagar
ahmednagar sakal

जामखेड तालुका - पावसाअभावी जामखेड तालुक्यातील ११ लघुपाटबंधारे तलावांपैकी तब्बल सात तलाव कोरडेठाक आहेत, तर खैरी मध्यम प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा असल्याने तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने खैरी व मोहरी तलावांतील पाणी राखीव ठेवले आहे.

जामखेड तालुक्यात सरासरीच्या केवळ ९२ टक्केच पाऊस झाला आहे. हा पाऊस विस्कळीत स्वरूपात झाल्याने या तलावांमध्ये पाणीसाठा झाला नाही. सप्टेंबरच्या शेवटी झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले, तर या पावसाच्या ओलीवरच रब्बी ज्वारीच्या पेरण्या शेतकरी करताना दिसत आहेत.

विंचरणा नदीवरील ११९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा तलाव व ४८.२५ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा जोड तलाव आणि ८३.७० दशलक्ष घनफूट क्षमता असलेला रत्नापूर लघुपाटबंधारे तलाव गेल्या महिन्यांत पाटोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, अन्य सात तलाव कोरडेठाक राहिल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.

५३३.६० दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या खैरी मध्यम प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा आहे, तर ६२.५० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मोहरी तलावात ३४.९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि मोहरी लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

योगेश चंद्रे, तहसीलदार.

ahmednagar
Atiq Ahmed Case : दोघांना मीडियासमोर का नेलं? सर्वोच्च न्यायालयाने UP सरकारला विचारला जाब

लघुपाटबंधारे तलाव

(कंसात साठवण क्षमता)

धोंडपारगाव (८७.९३)

पिंपळगाव आळवा (१००.४९)

अमृतलिंग (४८.४०)

धोत्री ( ५५.६०)

नायगाव (८३.७६)

ahmednagar
Ahmednagar : ‘आग’ गाडी नगर-आष्टी रेल्वेचे पाच डबे जळून खाक वाळुंज शिवारात थरार

तेलंगशी (३७.९४)

जवळके ( ३६.१९)

बंधाऱ्यांतील साठा

(कंसात क्षमता)

जवळा - १५.३७ (४३.२५)

कवडगाव - ९.०० ( ०.७१)

गिरवली - २.७४ ( २२.७८)

पिंपरखेड - ११.३३ (२३.४०)

सांगवी - ४.५७ ( ३०.४५)

मंडलनिहाय पाऊस

(कंसात टक्केवारी)

जामखेड - ६०६.९ मिमी (१०४.२)

अरणगाव - ४७३.३ मिमी (८२)

खर्डा - ४८३ मिमी ( ८३)

नान्नज - ५१८ मिमी ( ८९)

नायगाव - ५१८ मिमी (१००.३)

एकूण - ५३३.४ मिलिमीटर (९२ टक्के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com