Ahmednagar : जपानी भाषेमुळे मिळाले २० लाखांचे पॅकेज; ‘संजीवनी’च्या विद्यार्थिनीचा अटकेपार झेंडा

ती येत्या काही दिवसांतच जपानला रवाना होईल. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी शिक्षणाच्या आधारे किती मोठी झेप घेऊ शकते, याचे नगर जिल्ह्यातील हे एक उत्तम उदाहरण आहे.
Ahmednagar
Ahmednagarsakal

सतीश वैजापूरकर : सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाची विद्यार्थी प्रणाली अशोक चौधरी हिने नगर जिल्ह्याचा झेंडा थेट जपानमध्ये फडकवला.

प्रणालीने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतानाच या महाविद्यालयात दीड वर्ष जपानी भाषेचे शिक्षण घेतले. त्याचा तिला फार मोठा लाभ झाला. त्याआधारे जपानमधूल हन्दा हेवी इंडस्ट्रीज या कंपनीने तिला तब्बल वीस लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन नोकरीची संधी दिली.

ती येत्या काही दिवसांतच जपानला रवाना होईल. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी शिक्षणाच्या आधारे किती मोठी झेप घेऊ शकते, याचे नगर जिल्ह्यातील हे एक उत्तम उदाहरण आहे.

Ahmednagar
Pune : बालकलाकार ते 80 वर्षांच्या जेष्ठ गायकांचा सहभाग; 'पुणे आयडॉल' स्पर्धेची अंतिम फेरी जल्लोषात संपन्न

प्रणालीचे वडील अशोक आणि आई पौर्णिमा हे नेवासे तालुक्यातील चांदा येथील सर्वसामान्य शेतकरी आहेत. शेतीतून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातून त्यांनी आपल्या तीनही मुलांना शिकविले. मोठा मुलगा सागर अभियंता झाला आणि नोकरीस लागला. धाकटा सार्थक संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो आहे.

प्रणालीने ‘संजीवनी’तून सॉफ्ट इंजिनिअरची पदवी घेताना या महाविद्यालयातच जपानी भाषेचे दीड वर्ष शिक्षण घेतले.

जपानी भाषा शिकल्याने तिच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. संजीवनी शैक्षणीक संकुल आणि परदेशी कंपन्यांना कुशल मनुष्यबळ पुरविणा-या एका संस्थेत करार झाला आहे. या संस्थेने जपानच्या हुन्दा या कंपनीकडे प्रणालीच्या नावाची शिफारस केली. तिला अतिरिक्त प्रशिक्षण दिले.

Ahmednagar
Chhatrapati Sambhaji Nagar: 'दुर्दैवी! खेळता खेळता लिफ्ट चालू केली अन्..' 14 वर्षीच्या मुलाचं शीर झालं धडावेगळं

ही शिफारस मान्य होऊन हुन्दा कंपनीने तिला वीस लाख रुपयांचे पॅकेज देऊन नोकरी दिली. एवढे मोठे पॅकेज मिळाल्याची बातमी समजताच प्रणाली आणि तिचे आई-वडील आनंदून गेले. आज त्यांनी येथे येऊन संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांची भेट घेऊन संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कोपरगावच्या संजीवनी शैक्षणिक संकुलातून मी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. याच महाविद्यालयात मी जपानी भाषा शिकले. सॉफ्टवेअर इंजिनिअर होताच मला पुणे येथील एका कंपनीने वार्षिक साडेसात लाखांचे पॅकेज देऊन नोकरी दिली.

मात्र, त्याच्या जोडीला मी जपानी भाषा आत्मसात केलेली असल्याने मला जपानी कंपनीने तब्बल वीस लाखांचे पॅकेज दिले. यावरून, संजीवनी शैक्षणिक संकुलाने जपान व जर्मनी भाषा शिकविण्याची केलेली व्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येते.

- प्रणाली चौधरी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, चांदे, ता. नेवासे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com