esakal | नगरचा शेतकरी झाला स्मार्ट, जिल्ह्यात ५८१ कंपन्या, गटांची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar farmer became smart, 581 companies and groups registered in the district

नोंदणी केलेल्या गटाला कंपनीत रुपांतर करावे लागणार आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतपिके, शेळ्या, कुक्कुटपालन, गोदामासाठी उत्पादक भागीदारी उपप्रकल्प व बाजार संपर्क वाढ महत्त्वाची आहे.

नगरचा शेतकरी झाला स्मार्ट, जिल्ह्यात ५८१ कंपन्या, गटांची नोंदणी

sakal_logo
By
सूर्यकांत नेटके

नगर ः शेतकरीउत्पादक कंपन्यामार्फत एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, यंदापासून सुरू होत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)मधून निधी दिला जाणार आहे. त्यात 40 टक्के वाटा लाभार्थींचा असून, 60 टक्के अनुदान मिळणार आहे. एका शेतकरी कंपनीला 10 कोटींपर्यंत निधी मिळू शकतो.

कृषी विभागाकडून फारसी जागृती झालेली नसतानाही जिल्ह्यात 581 कंपन्या व गटांनी नोंदणी केली. त्यातील 278 शेतकरीउत्पादक कंपन्यांनी कृषीच्या आत्मा विभागाकडे प्रस्ताव दिले. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारामुळे कर्जत-जामखेड तालुक्‍यात सर्वाधिक 103 शेतकरी गट कंपन्यांनी नोंदणी केली असून, तेथून 56 प्रस्ताव दाखल झाले आहेत. 

हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा, लोकांना मरणाच्या दारातून आणणारात तिथे अडकला

शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषीच्या आत्मा अंतर्गत शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची नोंदणी केली. आता शेतकरी कंपन्यांसाठी शासनातर्फे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे.

राज्यात सात वर्षांसाठी एकूण 1421 कोटींचा हा प्रकल्प असून, पहिल्या टप्प्यात 648 कोटींच्या योजनांसाठी शेतकरी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. शेतकरीगटही त्यात नोंदणी करू शकतो. मात्र, प्रस्ताव दाखल करताना शेतकरी कंपनी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे 581 संस्थांची नोंदणी झाली असली, तरी 278 शेतकरी कंपन्यांनी प्रस्ताव दिले आहेत.

नोंदणी केलेल्या गटाला कंपनीत रुपांतर करावे लागणार आहे. 
स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतपिके, शेळ्या, कुक्कुटपालन, गोदामासाठी उत्पादक भागीदारी उपप्रकल्प व बाजार संपर्क वाढ महत्त्वाची आहे. मार्चमध्ये दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचे आत्मा विभागातून सांगण्यात आले. 

तालुकानिहाय प्रस्ताव (कंसात एकूण नोंदणी) 
नगर ः 16 (39), पारनेर ः 15 (37), पाथर्डी ः 11 (36), कर्जत ः 43 (79), जामखेड 13 (24), श्रीगोंदे ः 20 (36), श्रीरामपूर ः 13 (29), राहुरी ः 19 (32), नेवासे ः 18 (45), शेवगाव ः 22 (47), संगमनेर ः 27 (54), अकोले ः 23 (46), कोपरगाव ः 21 (41), राहाता ः 17 (36). 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image