Ahmednagar Fire : महावितरणची भूमिका असहकाराचीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Fire : महावितरणची भूमिका असहकाराचीच

Ahmednagar Fire : महावितरणची भूमिका असहकाराचीच

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जळीतकांडाच्या तपासात पोलिसांना महावितरणचा विद्युत निरीक्षक अहवाल पाहिजे आहे. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी वीज वितरणला चार पत्रे पाठवूनही ते कोणताच प्रतिसाद देत नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य शासनाने नाशिक विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून स्वतंत्रपणे तपास केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक मिटके करीत आहेत. मिटके यांच्याकडून महावितरण कंपनीला चार वेळा पत्रे पाठवून, अतिदक्षता विभागाचा विद्युत निरीक्षक अहवाल मागविला आहे. महावितरण कंपनी हा अहवाल देण्यास टाळाटाळ करीत आहे.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

मृत्यूंची संख्या चौदावर

जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात जखमी झालेल्या रंभाबाई अंजाराम विधाते (वय ८०, रा. बाभूळवेडे, ता. नेवासे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे जळीतकांडातील मृत्यूंचा आकडा १४वर पोचला आहे.

पोखरणांच्या जामिनावर सुनावणी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी (ता. २३) सुनावणी होणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. ॲड. अनिल ढगे सरकारच्या वतीने काम पाहत आहेत.

loading image
go to top