सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CJI N Ramanna

सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

पुट्टपार्थी : आपण घेतलेल्या निर्णयांच्या उपयुक्ततेबाबत सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावयास हवे. तसेच स्वतःतील अवगुणांचाही त्यांनी शोध घ्यायला हवा, असं वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी केलंय. आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील श्री सत्य साई उच्च शिक्षण संस्थेच्या ४० व्या पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

हेही वाचा: Delhi Pollution: बांधकामांवरील निर्बंध मागे; शाळा सुरु होण्याची शक्यता

रमणा म्हणाले की, लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी आपला दिनक्रम सुरु करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावं. लोकांच्या गरजांनुसार निष्पक्ष व्यवस्था त्यांनी निर्माण करायला हवी. लोकशाहीत सर्वसामान्य जनताच सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे सरकारचा प्रत्येक निर्णय जनतेचा फायदा डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात यावा. त्यांनी रामायण आणि महाभारताचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना नुकसानकारक असणाऱ्या चौदा अवगुणांचाही या वेळी उल्लेख केला.

हेही वाचा: ऑनलाईन क्लासमध्ये मुलीला डान्स करायला सांगितलं; शिक्षक अटकेत

सत्य साई बाबांबद्दल बोलताना रमणा म्हणाले, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, आपत्कालीन मदतकार्य अशा अनेक क्षेत्रांत सत्य साई बाबांनी काम करून आपल्यालाही मार्ग दाखवला आहे. त्यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचंही ते म्हणाले.

आधुनिक शिक्षण पद्धती अपूर्ण

नम्रता, शिस्त, निःस्वार्थी वृत्ती, करुणा, सहिष्णुता, क्षमा आणि परस्परांचा आदर या नैतिक मूल्यांची शिकवण देणारे शिक्षणच खरे शिक्षण आहे. मात्र दुर्दैवाने आधुनिक शिक्षण पद्धती केवळ व्यावहारिक ज्ञानावर भर देते. या पद्धतीत नैतिक आणि आध्यात्मिक पैलू दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीचे भान येत नाही, असे मत रमणा यांनी व्यक्त केले.

loading image
go to top