Ahmednagar : पंधरा वर्षांचा संघर्ष ; अखेर उड्डाणपुलाचे स्वप्न साकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : पंधरा वर्षांचा संघर्ष ; अखेर उड्डाणपुलाचे स्वप्न साकार

अहमदनगर : शहरात प्रदीर्घ संघर्षानंतर उड्डाणपूल उभा राहिला. या पुलासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत अनेकांनी भूमिपूजन केले. सर्वच पक्षांच्या कार्यकाळात पुलाचा प्रवास पुढे सरकला. शनिवारी केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‍घाटन होऊन वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात येणार आहे. या पुलाचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात.

अहमदनगर शहरातून पुणे, दौंड, औरंगाबाद, मनमाड, पाथर्डी, बीड या शहरांत जाण्यासाठी स्टेशन रस्त्यावरून जावे लागत असे. याच रस्त्यावर माळीवाडा आणि स्वस्तिक चौक बसस्थानक, नगर तालुका बाजार समिती आहे. पूर्वी कांद्याचे लिलावही या समितीत व्हायचे. त्याकाळी बायपास नसल्याने अवजड वाहनेही शहरातून जायची. परिणामी, वाहतुकीची प्रचंड कोंडी व्हायची. यावर उपाययोजनांसाठी साधारणपणे २००५ मध्ये उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला.

बाजार समिती आणि माळीवाडा बसस्थानकाजवळ छोटासा उड्डाणपूल २००६ मध्ये बांधण्याचे ठरले. राज्य सरकारच्या अखत्यारित या कामास मंजुरी मिळाली. सुरवातीला १५ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात येणार होता. मात्र त्याचा खर्च पुढे वाढत गेला. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी व्हीजन-२०२० राबविण्यास सुरवात केली. त्यावेळी ७५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. हा खर्च राज्य सरकार आणि महानगरपालिका यांना करावा लागणार होता. जवळपास २५ कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार होता, त्यामुळे हे काम सुरूच झाले नाही. त्यानंतर २००९ मध्ये लोकसभेच्या पुन्हा निवडणुका झाल्या. खासदार दिलीप गांधी यांनी २०१२मध्ये कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात असल्याने

खासदार डॉ. सुजय विखे यांचा पाठपुरावा

२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे विजयी झाले. संरक्षण मंत्रालयाकडून ना-हरकत मिळाले नव्हते. खासदार विखे यांनी मंत्री गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत मिळाले. खासगी, सरकारी व लष्करी मालकीच्या १०.३० हेक्टरचे भूसंपादन झाले. नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वर्क ऑर्डर काढली. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते कामाचे पूजन केले. तत्कालीन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी नारळ फोडला. २८ जुलै २०२० रोजी पुलाच्या कामास प्रत्यक्षात सुरवात झाली. २२ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूल उभा राहिला.

भूमिपूजनाला दिग्गजांचे हात

भूमिपूजनाला दिग्गजांचे हात लागले. २०१० मध्ये तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तेही भूमिपूजन झाले. त्यानंतर प्रस्तावित उड्डाणपूल केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला. २०१४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी यांनीही पाठपुरावा केला. २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑनलाइन भूमिपूजन केले.

दृष्टिक्षेपात उड्डाणपूल

सक्कर चौक ते चांदणी चौक

अंतर - ३.०८० किलोमीटर भूसंपादन - १०.३० हेक्टर

खर्च -२५८.३० कोटी चौपदरी

पिलर - ८३ रॅम्प-२

सेगमेंट -९३१ आय गिडर - १५०

राबलेले कामगार- ६०० कामाचे महिने - २२