
अहमदनगर : लुटारूंची टोळी अटकेत
शेवगाव : पायी जाणाऱ्या एकाला दोन दुचाकी आडव्या लावून लुटणाऱ्या टोळीतील पसार झालेल्या पाच पैकी चार आरोपींना शेवगाव पोलीसांनी अटक केली. इरफान रफिक शेख (वय- २१), जहीर उर्फ जज्जा नवाज शेख (वय-२०), सोमनाथ रामनाथ गवते (वय-२२), अरबाज शहाबुद्दीन शेख (वय-२१, सर्व रा. शेवगाव) या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना मंगळवार (ता.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शाहरुख पटेल (वय-२३) हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादी हे शनिवार ( ता. ६) रोजी शेवगाव नेवासे रस्त्यावरील बॉम्बे मशिनरी समोरुन रात्री सव्वानऊ वाजता पायी चालले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एका पल्सरवर तीन व स्कुटीवर बसुन दोन जण येवून थांबले. त्यांच्याकडील ॲपल आयपॅड असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेले. याबाबत त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तेव्हापासून आरोपी फरार होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेवून गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, रवींद्र बागूल, विश्वास पावरा या अधिकाऱ्यासह सहाय्यक फौजदार भगवान बडधे, पांडुरंग वीर, पुरुषोत्तम नाकाडे, अशोक लिपणे, सुधाकर दराडे, प्रविण बागुल, सुखदेव धोत्रे, किरण टेकाळे, रविंद्र शेळके, सोमनाथ घुगे, महेश सावंत, बप्पासाहेब धाकतोडे, हरी धायतडक, वासुदेव डमाळे, अस्लम शेख, शहाजी आंधळे, संपत खेडकर, समीर फकीर, संतोष धोत्रे, संगिता पालवे, प्रियंका शिरसाठ आदींची तीन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Gang Robbers Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..