
नगरला मिळाला सलग दुसऱ्या ३८ केएल अॉक्सीजन
नगर ः जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी 38 केएल ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांसाठी ही बाब समाधानकारक आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयांना माफक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 22 हजार 840 झाली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे 60 के.एल. ऑक्सिजनची गरज भासते.
जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी, रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसी, तसेच विशाखापट्टणम येथून विशेष रेल्वेने नगरला ऑक्सिजन मिळाला आहे. सोमवारी (ता. 26) चाकण एमआयडीसीतून 38 केएल ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांनी दिली.
Web Title: Ahmednagar Got 38 Kl Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..