Ahmednagar : सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या ; खासदार सदाशिव लोखंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदाशिव लोखंडे

Ahmednagar : सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या ; खा. सदाशिव लोखंडे

अकोले : राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.  मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच नगरविकास खाते असल्यामुळे अकोले नगरपंचायतीला भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले. तेव्हा त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शेंगाळ, माजी सदस्या सुषमा दराडे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अकोले नगरपंचायतीच्या वतीने त्यांचा नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य सभापती शरद नवले, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार बांधकाम सभापती वैष्णवी धुमाळ, महिला बालकल्याण समिती सभापती प्रतिभा मनकर, नगरसेवक नवनाथ शेटे, विजय पवार, सागर चौधरी त्यांचा सत्कार केला.

अकोले नगरपंचायत अंतर्गत योग भवनासाठी ८० लाख रुपये, चौक सुशोभीकरणासाठी ८० लाख, रस्त्यांसाठी ४० लाख असा २ कोटी रुपयांचा निधी खासदार लोखंडे यांचे मार्फत प्राप्त झाला आहे. आगामी काळात नगरपंचायतीने विकास आराखडा बनवून पाठवावा त्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अकोलेत शक्ती प्रदर्शन

खासदार म्हणून केलेल्या विविध कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अकोले पर्यंत येतांना रस्त्यात ठिकठिकाणी खासदार लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.