श्रीगोंद जिल्हा परिषद
श्रीगोंद जिल्हा परिषद

अहमदनगर : श्रीगोंद्यात गट-गण पुनर्रचनेत अधिकाऱ्यांवर राजकीय दडपण

महसुली अधिकाऱ्यांची परीक्षा, एक गट व दोन गण वाढणार
Published on

श्रीगोंदे : जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन नवीन गण तालुक्यात अस्तित्वात येत आहेत. त्यासाठी सुरू असणाऱ्या गोपनीय पुनर्रचनेचा प्रस्ताव आपल्याच हिताचा तयार व्हावा यासाठी महसुली अधिकाऱ्यांवर मोठे राजकीय दडपण आल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये अनेक नेत्यांच्या गटांना यात धोक्याची शक्यता असल्याने वजनदार पुढारी ही रचना कशी करावी यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा तर पंचायत समितीचे बारा गण आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार नव्याने एक गट व दोन गण तयार होणार आहेत. त्यासाठी तहसीलदार मिलिंद कुलथे व संबंधित कर्मचारी नवीन रचनेचा प्रस्ताव तयार करीत आहेत. दरम्यान, नव्याने होणारा गट व गण आपल्याच राजकीय हिताचे व्हावेत, यासाठी प्रमुख काही नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

श्रीगोंद जिल्हा परिषद
औरंगाबाद : दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

या बाबत तहसीलदार कुलथे यांना संदेशही आल्याचे समजते. अर्थात कुलथे यांनी त्यांच्यावर कुठलेही राजकीय दडपण आले नसल्याचे सांगत सारवासारव केली. या रचनेत महसूल यंत्रणेवर मोठा ताण असल्याची लपून राहत नाही. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी झालेल्या अशाच फेररचनेत मोठा राजकीय दबाव असतानाही जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या त्यावेळच्या वरिष्ठ महसूली अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ही रचना अतिशय शांत डोक्याने यशस्वीपणे व नियमानुसार करताना राजकीय नेत्यांना शांत केले होते. आता या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा या रचनेत उपयोग करून घेतला तर महसूलचा ताण कमी होईल.

अशी होणार नव्या गट व गणांची रचना

घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे गट व गणांची पुनर्रचना केली जाणार आहे. लोकसंख्येचा तोडगा त्यात महत्वाचा आहे. यापूर्वीचे गटातील गावांची रचना बदलणार आहे. अनेक गटातील नेत्यांना मानणारी गावे दुसऱ्या गटात जाण्याचा धोका असला तरी त्यात बहुतेक सगळ्यांचा फटका बसणार आहे. तरीही नेत्यांना त्यांच्या हिताची रचना करुन हवी असल्याने अडचणी वाढत आहेत.

श्रीगोंद जिल्हा परिषद
कोरोनामुक्‍तीनंतर मृत्यू झालेल्यांनाही 50 हजारांची मदत! ऑफलाइन अर्ज करता येईल

नगर-दौंड महामार्गाच्या पश्चिमेला होवू शकतो नवा गट

समजलेल्या राजकीय चर्चेनुसार लिंपणगाव अथवा भानगाव या भागात नव्या गटांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाल्यास बेलवंडी गटात असणाऱ्या वांगदरी गावचा समावेश काष्टी गटात होण्याचा राजकीय धोका वाढतो. शिवाय काष्टी, आढळगाव गटातील गावांचीही मोडतोड प्रमुख नेत्यांना परडवणारी नाही. त्यामुळे नवा गट नियमानुसार नगर-दौंड महामार्गाच्या पश्चिमेकडच्या गावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी देवदैठण व घारगाव हे दोन गावांना संधी मिळू शकते. तसे झाल्यास कोळगाव, येळपणे व बेलवंडी गटातील गावांची रचना बदलणार आहे.

''राज्य निवडणूक आयोगाच्या आदशानूसार ही फरेरचना केली जाईल.नियमानूसार नवा गट व गण कुठल्या भागात तयार होतात हे पाहत असून नियमानूसारच काम केले जाईल.याकामी कुणाचाही दबाव नाही.''

- मिलिंद कुलथे,तहसीलदार श्रीगोंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com