esakal | काय सांगता? हा तालुका दरवर्षीच पाळणार लॉकडाउन, हा दिसलाय फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar taluka will observe lockdown every year

लॉकडाउनमुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. काहींनी तर आत्महत्या सुरू केल्या आहेत. परंतु या लॉकडाउनने अनेक सकारात्म गोष्टींना जन्म दिला आहे. त्याचाच विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्याने दरवर्षीच आठ दिवस लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

काय सांगता? हा तालुका दरवर्षीच पाळणार लॉकडाउन, हा दिसलाय फायदा

sakal_logo
By
दत्ता इंगळे

नगर तालुका : कोरोनामुळे लॉकडाउन झाले. त्याचे काय फायदे, काय तोटे होतात, हे यातून आता स्पष्ट झाले आहे. तोटे जसे आहेत तसे फायदेही आहेत. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार गेले असले तरी आगामी वर्षापासून संपूर्ण नगर तालुकाच दरवर्षी आठ दिवस लॉकडाउन करण्यात येणार आहे. तसा निर्णय पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. 

पंचायत समितीची मासिक सभा सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती कांताबाई कोकाटे उपस्थित होत्या. या सभेला उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा ः मोठी बातमी ः नगरमध्ये एकाच कुटुंबात आढळले पाच बाधित,  सथ्था कॉलनीत कोरोनाची सत्ता

या सभेत कोरोनाबाबत होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी लॉकडाउनमुळे काही बाबी जमेच्या असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वर्षातून एकदा संपूर्ण तालुका लॉकडाउन करण्यात यावा, असा मुद्दा माजी सभापती रामदास भोर यांनी मांडला. त्यावर चर्चा होऊन संपूर्ण तालुका वर्षातून आठ दिवस लॉकडाउन करण्याचा ठराव झाला.

हिवरेबाजार ग्रामपंचायतीने याबाबत पूर्वीच तसा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नगर पंचायत समितीने संपूर्ण तालुकाच लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण तालुका दरवर्षी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेणारी नगर पंचायत समिती राज्यात पहिली आहे, अशी माहिती प्रवीण कोकाटे यांनी दिली. 
 

मे महिन्यातील सलग आठ दिवस नगर तालुका बंद करण्यात येणार आहे. या काळात लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाहतूक यासह विविध कामांची उद्‌घाटने असे सर्वच व्यवहार बंद राहतील. लॉकडाउनमुळे सामाजिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. याचे महत्त्व सर्वांना पटल्यामुळे बैठकीत या विषयावर एकमत झाले. 
- कांताबाई कोकाटे, सभापती, नगर पंचायत समिती 

loading image