अहमदनगर : रुग्णालयांचे होणार ‘फायर ऑडिट’

आरोग्य समितीच्या बैठकीत सूचना; ‘बॉम्‍बे नर्सिंग होम ॲक्ट’चे पालन हवे
fire audit
fire auditfire audit

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून ११ रुग्णांचा बळी गेला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करावे, अशा सूचना आज झालेल्या महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

अहमदनगर महानगरपालिका आरोग्य समितीच्या वतीने शहरातील खासगी रुग्णालयांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या सर्व प्रतिनिधींना अग्नितांडवासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ, तसेच रुग्णालयाचे डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सागर बोरुडे म्हणाले, की प्रत्येकाने कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. बॉम्‍बे नर्सिंग होम ॲक्टची अंमलबजावणी करावी. यामध्ये महत्त्वाचा फायर सेफ्टी हा भाग असून, त्यात त्रुटी असणाऱ्यांनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात, जेणे करून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची सुरक्षितता अबाधित राहील. शहरामध्ये अग्नितांडवासारख्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व खासगी रुग्णालयांनी काळजी घ्यावी.

मिसाळ म्हणाले, की खासगी रुग्णालयांनी शासनाच्या अधिकृत एजन्सीद्वारे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. त्याची एन. ओ. सी. अग्निशामक दलात सादर करावी. इलेक्ट्रिकल्स ऑडिट करणेही गरजेचे आहे. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांना फायर ऑडिटसंदर्भात अग्निशामक दलाच्या वतीने मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाईल. हॉस्पिटलमधील अग्निबचाव यंत्रणा कायमस्वरूपी कार्यान्वित असावी.

fire audit
T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार डेमो

प्रत्येक रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे सर्टिफिकेट आवश्यक असते. तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. त्यामधील तरतुदीनुसार दर वर्षी रुग्णालयाचे फायर ऑडिट करून ते संबंधित यंत्रणेकडे जमा करावे लागते. मात्र, बहुतेक रुग्णालये दर वर्षी ते न सादर करता थेट तीन वर्षांनी जमा करतात. इतर दोन वर्षांचा दंड प्रतिदिन रुपये ५० असतो. तेवढी रक्कम भरली जाते. त्यामुळे एकदा प्रमाणपत्र मिळाले, की त्याकडे तीन वर्षे पाहिले जात नाही. परिणामी, अग्निशामक यंत्रणा कुचकामी झालेली असते. बहुतेक ठिकाणी पाणी येणारे नोजल खराब असतात. चाके ऐन वेळी फिरत नाहीत. अलार्म वाजत नाही. कर्मचारीही प्रशिक्षित नसल्याने, आग लागल्यास धावपळ होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक वर्षी डेमो होणे आवश्यक आहे.

शहरातील रुग्णालयांची अचानक पाहणी

फायर ऑडिट झालेले आहे की नाही, अग्निशामक यंत्रे, पाणी येण्याचे मार्ग कार्यान्वित आहेत की नाहीत, आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास कर्मचारी प्रशिक्षित आहेत की नाहीत, याबाबत पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य समितीच्या माध्यमातून शहरातील सर्व रुग्णालयांची अचानक पाहणी करण्यात येणार आहे. या समितीत तज्ज्ञ डॉक्टर, फायर ऑडिट करणारे संबंधित अधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित असतील. दोषी असणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईबाबतही लवकरच पॅटर्न ठरविण्यात येणार आहे.

fire audit
एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुःखदायक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती शहरात घडणार नाही, यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक खासगी रुग्णालयाची पाहणी करून तेथील फायर ऑडिट, तसेच यंत्रणा सक्रिय केली जाणार आहे.

- डॉ. सागर बोरुडे, आरोग्य समिती, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com