T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AUS vs PAK
T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Pakistan vs Australia, 2nd Semi-Final : अपराजित पाकिस्तानला पराभूत करुन दाखवत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध ते फायनल खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी केली. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या होत्या. वॉर्नरने 49 धावा करुन संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या षटकात मॅथ्यू वेडनं आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत संघालाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी फायनल खेळतील. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत नवा गडी नव राज्य हे चित्र पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलाय असं वाटतं होते. मॅक्सवेलच्या रुपात ऑस्ट्रेलियाने 96 धावांवर पाचवा गडी गमावला. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड या जोडीनं 81 धावांची भागादीरी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या. मिशेल स्टार्कने सर्वाधिक दोन तर पॅट कमिन्स आणि झम्पाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. शाहीन शाह आफ्रिदीनं पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला तंबूत धाडले.

हेही वाचा: VIDEO : दोन टप्पी चेंडू अन् वॉर्नरचा तडाखा

पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर आला होता. पण वॉर्नर आणि मिशेल मार्शने 52 धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. ही जोडी परतल्यानंतर स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांना नावाला साजेसा खेळ करता आला नाही. 5 बाद 96 धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडनं संघाच्या विजयी मिळवून देणारी दमदार भागिदारी केली.

loading image
go to top