Ahmednagar : मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे; जरा दम धरा -अजित पवार

आमदार नीलेश लंके यांच्या वतीने मोहटा देवीदर्शन यात्रेचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला.
ajit pawar
ajit pawar sakal

पारनेर - मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. परंतु मागासवर्गीय, आदिवासी, भटके, ओबीसी यांच्यासह इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता द्यायचे आहे. कायद्याच्या चौकटीत आणि न्यायालयात टिकेल, असे हे आरक्षण असणार आहे. तशी तयारी सरकारकडून सुरू आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून काहींना दमच निघत नाही. यावर टोकाची भूमिका घेतली जात आहे. कोणी समजून घ्यायला तयार नाही, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

आमदार नीलेश लंके यांच्या वतीने मोहटा देवीदर्शन यात्रेचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेल्या अस्थिरतेवर त्यांनी भाष्य केले. परिस्थिती समजावून घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यात सध्या अस्थिरतेची परिस्थिती आहे. सर्वच जाती आरक्षण मागत आहेत. आपल्या राज्याला शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्यानुसार राज्य सरकारचा कारभार सुरू आहे. आरक्षण मिळावे अशीच आमची भावना आहे. आरक्षणाची मागणी करताना वातावरण खराब होऊ देऊ नका. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी आपापल्या भूमिका घेत आहेत. यातून जातीजातीत आणि धर्मात भांडणे वाढत आहेत. ती कोणालाच नको आहेत, असेही ते म्हणाले.

ajit pawar
Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामतीतील विकासकामांची पाहणी

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, दीपक पवार, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, अॅड. राहुल झावरे, गंगाराम बेलकर, बापू शिर्के, नगराध्यक्ष नितीन आडसूळ, डॉ. बाळासाहेब कावरे, अशोक कटारिया, बाळासाहेब खिलारी, सचिन पठारे, भाऊसाहेब भोगाडे, कारभारी पोटघन, दीपक पवार, दीपक लंके, जितेश सरडे, अशोक घुले, मारुती रेपाळे, बंटी साबळे, कैलास गाडीलकर, संदीप मगर, किशोर थोरात आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com