esakal | नगर बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटो स्वस्त; घेवडा महागला
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

नगर बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटो स्वस्त; घेवडा महागला

sakal_logo
By
ज्योती देवरे

अहमदनगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.१२) टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. टोमॅटो गेल्या आठवड्यापेक्षा प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी स्वस्त झाले, तर घेवड्याची आवक घटल्याने तो एक हजाराने महागला. बाजार समितीत ७१२ क्विंटल भाज्यांची, तर १४८ क्विंटल बटाट्याची आवक झाली. टोमॅटोची २०१, वांगी २९, फ्लॉवर ६२, कोबी ४१, काकडी ५६, गवार १४, घोसाळी १, वाल ३, घेवडा २, दोडका १३, भेंडी ४३, कारली २७, मिरची १८, सिमला मिरची २१, लसूण ७, शेवगा ९, आले ४, दुधीभोपळा ९, तसेच भुईमुगाच्या शेंगांची १८ क्विंटल आवक झाली. ( Ahmednagar-market-committee-vegetables-rates-news-jpd93)

फळभाज्यांचे क्विंटलचे भाव

टोमॅटो सहाशे ते आठशे, वांगी दोन ते तीन हजार, फ्लॉवर एक हजार सातशे पन्नास ते अडीच हजार, कोबी दीड हजार ते दोन हजार, काकडी एक हजार ते दीड हजार, गवार साडेचार ते साडेपाच हजार, घोसाळी दोन हजार दोनशे ते अडीच हजार, दोडका तीन ते चार हजार, कारली तीन ते साडेतीन हजार, भेंडी दोन ते अडीच हजार, घेवडा साडेतीन ते चार हजार, वाल साडेतीन ते चार हजार, लसूण सहा ते आठ हजार, हिरवी मिरची दोन हजार सातशे पन्नास ते साडेतीन हजार, सिमला मिरची दोन हजार दोनशे ते अडीच हजार, शेवगा अडीच ते साडेतीन हजार, बटाटे नऊशे ते एक हजार, दुधी भोपळा सातशे पन्नास ते एक हजार रुपये.

पालेभाज्या (शेकडा)

मेथी आठशे ते एक हजार, पालक सहाशे ते सातशे, शेपू साडेचारशे ते पाचशे, कढीपत्ता साडेचारशे ते पाचशे, कोथिंबीर पाचशे ते सहाशे रुपये.

हेही वाचा: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख

हेही वाचा: वधूसह नातेवाइकांना पोलिसी पाहुणचार! चौघांना अटक

loading image