Nilesh Lanke Doctorate: कोरोना काळात केलेल्या कार्याचा हा सन्मान! नीलेश लंकेना डॉक्टरेट प्रदान

फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे आमदार लंके यांना होरोनरीस कॉसा डॉक्टरेट या मानद पदवीने गोव्यातील पणजी येथे डॉ. रिपू राजन सिन्हा, डॉ. अरुण ओमिनी, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. संग्रामसिंह रामराव माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Nilesh Lanke Doctorate: कोरोना काळात केलेल्या कार्याचा हा सन्मान! नीलेश लंकेना डॉक्टरेट प्रदान
Updated on

Nilesh Lanke Received Doctorate: कोरोना काळात आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या कामाची व योगदानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे आमदार लंके यांना होरोनरीस कॉसा डॉक्टरेट या मानद पदवीने गोव्यातील पणजी येथे डॉ. रिपू राजन सिन्हा, डॉ. अरुण ओमिनी, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. संग्रामसिंह रामराव माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रा. संजय लाकूडझोडे, सुदाम पवार, अ‍ॅड. राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे, अनिल गंधाक्ते, कांतीलाल भोसले, अभय नांगरे, दादा दळवी, सुरेश फापाळे, नाथाजी बोरकर, शुभम दाभाडे आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातल्यानंतर आमदार लंके यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवरील मोफत उपचार केले. त्या वेळी सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जनतेची उपासमार होऊ नये म्हणून अन्नछत्र सुरू केले. लॉकडाऊनमुळे परराज्यांमधील नागरिक त्यांच्या गावी घरी परतत असताना त्यांच्या जेवणाची निवासाची व्यवस्था करण्यासाठी लंके यांनी पुढाकार घेतला होता. त्याच काळात कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानंतर कर्जुलेहर्या व भाळवणी येथे एक हजार शंभर बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर मोफत उपचार करून रूग्ण सेवा दिली. त्यांच्या या कामाची दखल घेत राज्यातूनच नव्हे तर देशभरातूनही लंके यांच्या रूग्णसेवेचे कौतुक झाले. (Latest Marathi News)

कोरोना महामारीच्या काळात मी व माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. वेळोवेळी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करताना हा सन्मान मनोबल वाढविणारा आहे. या सन्मानाने समाजासाठी काम करण्यासाठी मला अधिक ऊर्जा मिळाली आहे- डॉ. नीलेश ज्ञानदेव लंके

Nilesh Lanke Doctorate: कोरोना काळात केलेल्या कार्याचा हा सन्मान! नीलेश लंकेना डॉक्टरेट प्रदान
Maratha Reservation : फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत? नाना पटोलेंचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.