
अहमदनगर : मोक्का गुन्ह्यातील आरोपी चंदू घावटे जेरबंद
अहमदनगर : मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार चंदू ऊर्फ चंद्रकांत भाऊसाहेब घावटे (वय २९, रा. शेळकेवाडी, राजापूर, ता. श्रीगोंदे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. तो वडिलांचे वर्षश्रध्दाला येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली.
राजाराम चंदर ढवळे (वय ४४, रा. राजापूर) यांची राजापूर शिवारात घोड नदीपात्रालगत शेत जमीन आहे. ढवळे हे त्यांच्या शेत जमिनीमधील माती विक्री करत असतात. दरम्यान २८ मे २०२१ व त्यापूर्वी संतोष राधू शिंदे (रा. राजापूर) व त्याच्या इतर साथीदारांनी ढवळे यांना वेळोवेळी दमदाटी करून, बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या शेतातील माती बळजबरीने घेऊन गेले आहे.
या प्रकरणी ढवळे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात दरोडा, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपींविरूध्द वाढीव मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. घावटे सदर गुन्ह्यात पसार होता.
दरम्यान, आरोपी घावटे हा त्याच्या वडिलाच्या वर्षश्रध्दाला येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, विशाल दळवी, शंकर चौधरी, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने राजापूर शिवारात सापळा लावून आरोपी घावटे याला अटक केली.
Web Title: Ahmednagar Mocca Chandu Ghavate Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..