nagar
nagarsakal

अहमदनगर : मुळा-भंडारदरा ओव्हर-फ्लो

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

अकोले : मुळा धरणाच्या सर्व अकरा दरवाजांद्वारे नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवून रात्री नऊ वाजता दहा हजार क्यूसेक करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या नवीन पाण्याचा आढावा घेऊन विसर्ग कमी-जास्त केला जाणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी नदीपात्रातून जायकवाडी धरणासाठी २१६० क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. पाणलोट क्षेत्रातून धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी (ता. १५) दुपारी एक वाजता ४३२०, तर सायंकाळी पाच वाजता ६००० क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजता विसर्ग पुन्हा वाढवून ८००० क्यूसेक केला आहे.

आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजता धरणसाठा २५ हजार ७१ दशलक्ष घनफूट (९६.४२ टक्के) झाला. लहीत खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीपात्रातून ८ हजार २८ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या हंगामात आजअखेर धरणात १६ हजार ८४० दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. मुळा धरण परिचलन सूचीनुसार एक ऑक्टोबर रोजी धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरण्यात येणार आहे.

सलग चौथ्यांदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. भंडारदऱ्यात १९० मिमी

अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी व वरदान ठरलेला भंडारदरा जलाशय आज दुपारी १२ वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असा पूर्ण क्षमतेने भरला. जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रांत मुसळधार श्रावणसरी कोसळत आहेत. भंडारदरा जलाशयात वेगाने आवक वाढल्याने आज जलाशय शंभर टक्के भरल्याने स्पिल-वे व विद्युतगृहामधून ३५८० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

घाटघर येथे आजपर्यंत ५०९९ मिलिमीटर पाऊस झाला, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी दिली. वाकी जलाशयातून एक हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने कृष्णावंती नदीला पूर आला आहे. रंधा धबधब्याचे रूप बाहुबली झाले आहे. निळवंडेमध्ये आवक वेगाने होत आहे. सुमारे सहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातही धुवाधार पाऊस पडत आहे.

आज जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, सरपंच दिलीप भांगरे यांनी जलाशयास साडी-चोळी अर्पण करून जलपूजन केले. दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने, म्हणजे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट इतका साठा झाल्याने जलाशय शंभर टक्के भरला. जलाशयातून ३५८३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com