
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशी 31 डिसेंबरला चार आदेश काढले. त्यानंतर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे आला. मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशी काढलेल्या आदेशाबाबत अधिकारी व नगरसेवकांनी डॉ. भोसले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
अहमदनगर : महापालिकेत केवळ 10 महिन्यांसाठी आलेल्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशीच चार आदेश काढले. हे चारही आदेश महापालिकेत वादाचा विषय ठरले होते. हे सर्व आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थगित केले.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशी 31 डिसेंबरला चार आदेश काढले. त्यानंतर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे आला. मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशी काढलेल्या आदेशाबाबत अधिकारी व नगरसेवकांनी डॉ. भोसले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.5) सर्व आदेशांची माहिती मागवली. हे सर्व आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केले आहेत. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी स्थगितीचे आदेश काढले आहेत.
हे ही वाचा : माजी आमदार कर्डिलेंना गावातच पुतण्याचेच आव्हान, म्हणाले असू दे डिपॉझिटच जप्त करतो
आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे यांची नगर सचिवपदी बदली, सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे सोपविलेले आस्थापना विभागाचे कामकाज, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित सर्व विभागांचे नियंत्रण, पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार, यांसह इतर सर्व विभागांना 31 डिसेंबरला मायकलवार यांनी दिलेले आदेश डॉ. भोसले यांनी स्थगित केले आहेत.