esakal | नगरची महापालिका इतक्या दिवस लॉकडाउन... या सेवा वगळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Municipal Corporation 14 days lockdown

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे महापालिका कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच त्यांनी एकत्र येऊ लॉकडाउनबाबतचा निर्णय घेतला आहे.

नगरची महापालिका इतक्या दिवस लॉकडाउन... या सेवा वगळल्या

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वर्क टू होम देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आज महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे. तसेच लोखंडे यांनी आयुक्त व महापौर यांच्याशी सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. महापालिकेतील 41 अधिकारी-कर्मचारी आत्तापर्यंत कोरोना झालेले आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने सोमवारपासून (ता. 10) अत्यावश्यक सेवा वगळता महापालिका बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका कामगार संघटनेने घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचा-यांमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव व कोरोना बाधित कर्मचा-यांची संख्या वाढत असल्याने महापालिकचे मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालया अंतर्गतची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये किमान 14 दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात येतील.

तेथील कर्मचा-यांकडून "वर्क फ्रॉम होम" या पध्दतीने महापालिकेतील कामकाज करून घेण्यात यावे. त्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यात यावी. कोरोना आजाराने मृत्यूमुखी पडलेले महापालिकेतील कर्मचा-यांच्या वारसांना सुरक्षा कवच विमा अंतर्गत 50 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा. त्यांच्या वारसांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घेण्यात यावे.

हेही वाचा - रोहित पवार का धावले आदित्य ठाकरे यांच्या मदतीला

त्यांच्या वारसांना महापालिका सेवेतील भविष्य निर्वाह निधी, उपदानाच्या रकमा आदी सर्व कायदेशीर देण्यात यावी. महापालिका कामगांरासाठी किमान 50 बेड चे स्वतंत्र कोविड केअर सेंटर उभारावे. कर्मचा-यांना तातडीने नियमितपणे हेण्डम्लोडस, मास्क, सॅनिटायझर, गमबूट व इतर संरक्षक साधने उपलब्ध करून द्यावीत. 50 वर्षे व यापुढील सर्व कर्मचा-यांना किमान 14 दिवसांची पगारी सुट्टी देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या सेवा राहणार सुरू
सोमवारपासून पाणी सोडणारे कर्मचारी, वैद्यकीय सेवा, घनकचरा दवाखाने व अग्निशमन सेवा वगळता महापालिकेतील सर्व सेवा बंद राहणार आहेत. यात जन्म मृत्यू नोंदणी, माहिती सुविधा व वसुली विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा ही समावेश आहे.

संपादन - अशोक निंबाळकर