महापालिका पोटनिवडणूक : विखे विरुद्ध जगताप! नेतृत्वाची होणार कसोटी

ahmednagar municipal corporation by-election
ahmednagar municipal corporation by-election

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमधील एका जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ आज वाढविण्यात आला. या जागेसाठी महाविकास आघाडी व भाजप (BJP) अशी लढत होत आहे. शिवसेनेचे (Shivsena) सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते, तर भाजपचे प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. ही निवडणूक डॉ. विखे (Dr Sujay Vikhe) विरुद्ध आमदार जगताप (MLA Sangram Jagtap) अशी लढली जात असल्याचे सध्या चित्र आहे. (Ahmednagar Municipal Corporation by-election)

प्रभाग नऊमधील नगरसेवक श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रिक्त झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पुढील केवळ दोन वर्षांसाठीच या पदावर काम करण्याची संधी मिळणार असल्याने, प्रारंभी निवडणुकीत खूप चुरस नव्हती. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला आहे. आज मात्र संबंधित पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातल्याने, चुरस होईल, असे चित्र आहे.

शिवसेनेचे सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज आमदार जगताप यांच्यासह महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरापासून करण्यात आला. या वेळी, कोणत्याही परिस्थितीत ही जागा महाविकास आघाडीला मिळवायची, असा निश्चय नेत्यांनी व्यक्त केला. तथापि, कॉंग्रेसचे नेते या निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती अविनाश घुले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रा. माणिक विधाते, धनंजय जाधव, आरिफ शेख, संजय शेंडगे, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराची सुरवात सर्जेपुरा चौकातून करण्यात आली. केंद्राने राबविलेल्या योजनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल, असे मत या वेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केले. खासदार डॉ. विखे पाटील, भाजपचे नेते ॲड. अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, माजी उपमहापौर मालन ढोणे, वसंत राठोड, अ‍ॅड. विवेक नाईक, तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

ahmednagar municipal corporation by-election
'सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर मला टॅक्सी चालवावी लागली'- पुतिन

केंद्राच्या योजनांचा लाभ होईल : खासदार डॉ. विखे

केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना नगर शहरात राबविण्यात आल्या. अमृत योजना, उड्डाणपूल यांसारखी मोठी कामे झाल्याने शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशीच कामे यापुढेही होणार आहेत. २०२३ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्व जागा स्वतंत्रपणे लढवून सत्ता मिळवेल. याची सुरवात या पोटनिवडणुकीत होणार आहे. या प्रभागातील नागरिक सुज्ञ असून, विकास कोणी केला ते चांगल्या पद्धतीने माहीत असल्याने, ते भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी या विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवाराला निवडून देतील, असा विश्वास आहे, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ahmednagar municipal corporation by-election
सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी; जाणून घ्या खासियत

राज्यातील सत्तेचा फायदा होणार : आमदार जगताप
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडीचाच उमेदवार असणार आहे. तो निवडून येण्यासाठी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करणार आहेत. नगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता असल्याने, या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमुळे नगरकरांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. या प्रभागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वचनबद्ध आहेत. त्यामुळे आघाडीला ही निवडणूक सोपी आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com