सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी; जाणून घ्या खासियत

Supersonic Missile Assisted Torpedo
Supersonic Missile Assisted Torpedo

संरक्षण विकास आणि संशोधन संस्था (DRDO) ने सोमवारी ओडिशातील बालासोर किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्र असिस्टेड टॉर्पेडो (SMART) ची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओने सांगितले की, ही प्रणाली पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे जी पारंपारिक टॉर्पेडोच्या रेंजच्या पलीकडे आहे.

ही पुढील पिढीतील प्रगत क्षेपणास्त्रावर आधारित टॉर्पेडो डिलीव्हरी प्रणाली आहे. डीआरडीओने सांगितले की, चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व क्षमतांचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीसाठी DRDO च्या अनेक प्रयोगशाळांनी विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. नौदलाला लवकरच त्याची भेट मिळू शकते.

या महत्त्वाच्या चाचणीच्या दोन दिवस आधी, DRDO आणि हवाई दलाने विकसीत केलेल्या स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. पोखरण रेंजमध्ये ही चाचणी झाली. या अँटी-टँक क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते हेलिकॉप्टरमधून डागता येते. अलीकडच्या काळात स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालीची ही तिसरी चाचणी होती.

Supersonic Missile Assisted Torpedo
जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पहिल्यांदाच महिला घुसखोर ठार

क्षेपणास्त्र आणि टॉर्पेडोमध्ये विशेष काय आहे? (Supersonic Missile Assisted Torpedo)

हे एक प्रकारचे सुपरसोनिक अँटी-शिप क्षेपणास्त्र आहे. यात कमी वजनाचा टॉर्पेडो बसवलेला असतो जो पेलोड म्हणून वापरला जातो. दोघांनी मिळून हे सुपरसॉनिक अँटी-सबमरीन क्षेपणास्त्र बनते, म्हणजेच याला क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये देखील असतील आणि पाणबुडी नष्ट करण्याची क्षमताही याला मिळणार आहे. पूर्णपणे तयार झाल्यावर, त्याची रेंज 650 किमी असेल.

इतक्या दूरपर्यंत मारक क्षमता असलेली प्रणाली भारताकडे असल्याने भारतीय नौदल जगातील सर्वात शक्तीशाली नौदलाच्या यादीत स्थान मिळणार आहे. भारतीय नौदलाकडे आधीच वरुणास्त्र नावाचे पाणबुडीविरोधी टॉर्पेडो आहे जो GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) च्या मदतीने आपल्या लक्ष्यावर मारा करू शकतो. त्या तुलनेत स्मार्ट वजनाने खूपच हलका आहे.

Supersonic Missile Assisted Torpedo
छत्रपती शिवाजी महाराजांना काशीमधून प्रेरणा मिळाली होती - PM मोदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com