अहमदनगर महापालिकेत पोटनिवडणुकीचे बिगुल; २१ डिसेंबरला होणार निवडणूक | Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elections

अहमदनगर महापालिकेत पोटनिवडणुकीचे बिगुल; २१ डिसेंबरला निवडणूक

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग नऊ-क मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २१ डिसेंबरला त्यासाठीचे मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या सहा डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील चार महापालिकांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची आचारसंहिताही संबंधित प्रभागापुरती लागू करण्यात आली आहे. प्रभाग नऊ-क या जागेवरील श्रीपाद छिंदमची जागा रिक्त झाली होती. या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. एक पद रद्द झाल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे. छिंदमचे वक्तव्य वादग्रस्त झाल्यानंतर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून हे पद कधी भरणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मध्यंतरी कोरोनामुळे बहुतेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता कोरोना रुग्ण कमी होऊ लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सरकारने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेसाठी इच्छुक असलेल्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


हेही वाचा: अहमदनगरसह चार जिल्ह्यात वाहने चोरणारा जेरबंद

पोटनिवडणूक ः प्रभाग नऊ-क
एकूण मतदार ः १८३९४
मतदान केंद्रे ः एकूण २४
उमेदवारी अर्ज भरणे ः २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर
अर्जांची छाननी ः ७ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत ः ९ डिसेंबर
चिन्हवाटप ः १० डिसेंबर
मतदान ः २१ डिसेंबर
निकाल ः २२ डिसेंबर

हेही वाचा: असा दातृत्वाचा हात, त्याची औरच बात

loading image
go to top