esakal | नगर महापालिकेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोना बळी

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Municipal Corporation employee dies of corona disease
नगर महापालिकेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः महापालिकेचे दोन कोरोना बाधित कर्मचारी काल खासगी रुग्णालयात अत्यावस्थ स्थितीत होते. नगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार महापालिका आयुक्‍त, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदींशी संपर्क साधून रेमडेसिव्हिरची मागणी केली तरीही रेमडेसिव्हिर मिळाले नाही. यातील एका कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला.

शहरात कोरोनाने थैमान घातला आहे. यातच महापालिकेचे 11 कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असताना तीन कर्मचारी काल अत्यावस्थ होते. त्यातील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन तातडीने देण्यात यावे असे डॉक्‍टरांनी सांगितले होते.

त्यानुसार महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार, महापालिका आयुक्‍त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदींशी संपर्क साधत तातडीने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याची याचना केली. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी हतबलता दाखविली.

अखेर यातील अत्यावस्थ असलेल्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. महापालिकेचे आणखी दोन कर्मचारी अत्यावस्थ आहेत.

सुरक्षा साधने केव्हा मिळणार

महापालिका कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून मास्क, सिनेटायझर, ग्लब्ज आदी वैद्यकीय सुरक्षा साधने मिळालेली नाहीत. महापालिका कामगार संघटनेकडून महापालिका आयुक्‍तांकडे वेळोवेळी मागणी करूनही वैद्यकीय सुरक्षा साधने मिळत नसल्याने कर्मचारी मोठ्या संख्येत कोरोना बाधित असल्याची चर्चा आज महापालिकेत होती.

महापालिका कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुरक्षा साधने, बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे जीव जात आहेत. ही स्थिती तातडीने न सुधारल्यास अत्यावश्‍यक सेवेसह महापालिकेतील सर्व सेवा बंद करू.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष, नगर महापालिका कामगार संघटना.