
अहमदनगर : महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देवूनही अपेक्षित वसुली झाली नाही. जेमतेम नऊ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे जप्तीची कारवाई झाली नाही. परंतु आता महानगरपालिका कर्मचारी निवडणूक कामातून मोकळे झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदार महानगरपालिकेच्या रडारवर आले असून, प्रशासनाकडून जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे.