esakal | मालकाचे पैसे बुडविण्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

खून

मालकाचे पैसे बुडविण्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मालकाकडुन घेतलेली अड्डीच लाख रुपयांची उचल बुडविण्यासाठी एका पित्याने आपल्या दहा महिन्याच्या चिमुरड्याचा गळा दाबून खुन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवारात प्लॅट नंबर बी. चार / दोनच्या उत्तरेकडील मोकळे जागेत आज (गुरुवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. येथील शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केल्याचे सांगितले.

याप्रकरणी मयत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी श्रावण बाळनाथ आहिरे (वय. ४०, रा. हिरेनगर, ता. नांदगांव, जि. नाशिक) हल्ली राहणार येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवार याच्या विरुद्ध आज (गुरुवारी) रात्री उशिरा येथील शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चार मुलासह पती समवेत काल बुधवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास झोपलेले होते. त्यावेळी पती श्रावण बाळनाथ आहिरे याने आमचे मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून घेतलेले अड्डीच लाख रुपये बुडविण्यासाठी माझा मुलगा सोपान आहिरे याचा गळा दाबून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरिक्षक संजय सानप यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून पहाणी केली. त्यानंतर शहर पोलीस पथकासमवेत श्वान पथक, ठशे तज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरणीय तपासणीसाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेहाची उत्तरणीय तपासणी व आरोपीची चौकशी करुन शहर पोलीस ठाण्याच रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

loading image
go to top