esakal | परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

police

शहरासह जिल्ह्यातील सहा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील ७८ जागांपैकी पोलिस दलातील बॅंड पथकातील तीन जागेसाठी शुक्रवारी (३) लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. प्राप्त अर्जापैकी ३७२५ पात्र उमेदवांना ही परीक्षा देता यणार आहे. शहरासह जिल्ह्यातील सहा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिस दलातील ७८ शिपाई पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये तीन जागा या बॅंड पथकासाठी आहेत. यासाठी २०१९ मध्ये १५ हजार ७६७ अर्ज दाखल झाले होते. यातील शिपाई पदाकरीता ९ हजार ५५० तर बॅड पथकासाठी ६ हजार २१७ अर्ज दाखल झाले होते. यावेळी पहिल्यांदाच उमेदवारांची लेखी परीक्षा व नंतर शारीरिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार

शुक्रवारी (३) बॅंड पथकासाठीच्या तीन जागांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्राप्त अर्जापैकी ३ हजार ७२५ उमेदवार पात्र झाले आहेत. त्यांना ही परीक्षा देता येणार आहे. कोल्हापूर शहर परिसरातील पाच तर हातकणंगले येथे एका परिक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सकाळी १० ते ११.३० या कालावधीत परिक्षा होणार आहे. अन्य ७५ पोलिस शिपाई पदासाठी ९५५० अर्ज आले आहेत, त्यापैकी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येईल. त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परिक्षा केंद्र -

१) राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (दसरा चौक)

२) न्यू मॉडेल इग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (नागाळा पार्क)

३) श्री विवेकानंद कॉलेज (नागाळा पार्क)

४) दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदीर, (पोलीस अधीक्षक कार्या. समोर)

५) सायबर कॉलेज (शिवाजी विद्यापीठ रोड)

६) संजय घोडावत इन्स्टीट्यूट (हातकणंगले)

हेही वाचा: 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

केंद्रावर मोबाईलला बंदी

परीक्षा केंद्रावर पात्र उमेदवारांनी फक्त ओळखपत्र आणि दोन पेन आणावेत. त्याव्यतिरिक्त मोबाईल अगर इतर वस्तू परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top