
अहमदनगर : जिल्ह्याचा विस्तार व वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यासाठी काही पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने शासनाकडे पाठविलेला आहे. परंतु मागील काही वर्षांपासून हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे. आता नवीन सरकारने तरी जिल्ह्यासाठी नवीन पोलिस ठाणे व पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आहे त्या चौक्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.